ECGC Recruitment: पदवीधर तरुणांना ECGC मध्ये ऑफिसर होण्याची संधी; पगार १,२०,००० रुपये; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

ECGC PO Recruitment: एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १ लाख २० हजार रुपये पगार मिळणार आहे.
ECGC Recruitment
ECGC RecruitmentSaam Tv
Published On

ज्या तरुणांचे नुकतेच ग्रॅज्युएशन झाले आहे आणि नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच ECGC मध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची ही चांगली संधी आहे.

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मोठ्या कंपनीमध्ये ऑफिसर पदावर काम करण्याची ही चांगली संधी आहे.

ECGC Recruitment
JOB: इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी; मिळणार २ लाख रुपये पगार; पात्रता आणि अटी जाणून घ्या

ईसीजीसीमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी दर महिन्याला १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. १ सप्टेंबर २०२४ च्या आधारावर ही वयोमर्यादा निश्चित करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये अर्ज फी भरायची आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये फी भरायची आहे. (ECGC Recruitment)

ECGC Recruitment
Mahatransco Job: पिंपरी चिंचवड महाट्रान्स्कोमध्ये नोकरीची संधी; अप्रेंटिस पदासाठी सुरु आहे भरती

या नोकरीसाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. या नोकरीसाठी तुमची MCQ परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला ४० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (ECGC PO Recruitment)

ECGC Recruitment
NABARD Job: दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिना ३५००० पगार; असा करा अर्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com