इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरीची चांगली संधी आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये सिनियर सिविलियन स्टाफ ऑफिसर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. इंडियन कोस्ट गार्जमध्ये ३८ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
सिविलियन स्टाफ ऑफिसर (लॉजिस्टिक्स), असिस्टंट डायरेक्ट (राजभाषा), सेक्शन ऑफिसर, सिविलियन गजटेड ऑफिसर (लॉजिस्टिक्स), स्टोरमध्ये फायरमॅन आणि स्टोर कीपर ग्रेड I पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (Government Job)
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी indiancoastguard.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज अधिसूचना जाहीर झाल्यापासून ६० दिवसांमध्ये म्हणजेच २ महिन्यात अर्ज करायचा आहे.
सिनियर सिविलियन स्टाफ ऑफिसर पदासाठी ३ रिक्त जागा आहे. सिविलियन स्टाफ ऑफिसर पदासाठी १२ जागा, असिस्टंट डायरेक्टर पदासाठी ३ रिक्त जागा आहे.स्टोर फायरमॅन पदासाठी २ रिक्त जागा आहेत. ३८ पदांसाठी भरती केली जाणार आहे.
सिविलियन स्टाफ ऑफिसर ते स्टोर किपर ग्रेड या पदासाठी उमेदवारांना जास्तीत जास्त २,०९,२०० रुपये मानधन मिळणार आहे. या नोकरीसाठी पदानुसार वेतन मिळणार आहे. (Indian Coast Guard Recruitment)
सर्वप्रथम उमेदवाराने indiancoastguard.gov.in या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर होमपेजवर भरती या ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर उमेदवाराने आवश्यक माहिती भरुन कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर अर्ज करा. त्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढा. (Indian Coast Guard Job)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.