ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS)मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती करण्यात येणार आहे.
AIIMS नवी दिल्ली आणि NCI झज्जर मध्ये ४२ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना rrp.aiimsexams.ac.in या वेबसाइटवर अर्ज करु शकतात. एम्समध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२४ आहे.
एम्समध्ये विविध विभागात सहाय्यक प्राध्यापकांची गरज आहे. त्यामुळेच ही भरती जाहीर केली आहे. याबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देण्यात आली आहे.
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी उमेदवारांना १ वर्षाच्या किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी काम करावे लागेल. या नोकरीसाठी उमेदवारांना १,४२,५०६ रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ३००० रुपये शुल्क भरावे लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २४०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अर्जाचे व्हेरिफिकेशन केले जाईल. त्यानंतर त्यानंतर एम्स नवी दिल्ली येथे मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.याबाबत सर्व माहिती वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येईल.
सर्वप्रथम उमेदवारांना rrp.aiimsexams.ac.in या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर फॅकल्टी रिक्रूटमेंट या टॅबवर क्लिक करावे.यानंतर सहाय्यक पदासाठी अर्ज करा. यानंतर संपूर्ण माहिती वाचा त्यानंतर तुमची माहिती भरुन लॉग इन करा. यानंतर अर्ज भरुन फॉर्म सबमिट करा.या फॉर्मची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.