Ladki Bahin Yojana : सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? महत्वाची अपटेड समोर

Ladki Bahin Yojana September Installment Amount Details: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती येणार पैसे, जाणून घ्या...
सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? महत्वाची अपटेड समोर
Ladki Bahin Yojana September Installment Amount DetailsSaam Tv
Published On

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana September Installment Date And Amount Details: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्य सरकारने महिलांच्या खात्यात दोन हप्त्यात 3000 रुपये जमा केले आहेत. याच योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याची माहिती समोर आली आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की, २९ सप्टेंबर रोजी रायगड येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा तिसरा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सप्टेंबरपर्यंत आलेले अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? महत्वाची अपटेड समोर
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! 'लाडक्या बहिणीं'च्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली, 'या' दिवशी खात्यात पैसे जमा होणार

अर्ज करण्याची तारीख वाढली

सरकारच्या या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आधी 31 ऑगस्ट होती. मात्र ही तारीख आता वाढवण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या होत्या की, ''लाडकी बहिन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.''

आदिती तटकरे म्हणाल्या होत्या की, ''योजनेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता पात्र महिलांसाठीची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यादी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची तारीख 31 जुलै होती, मात्र मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने 31 ऑगस्टपर्यंत अंतिम तारीख वाढवण्यात आली होती.''

सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? महत्वाची अपटेड समोर
PM Kisan Yojana: PM किसान योजनेचा १८ हप्ता पुढच्या महिन्यात; हे काम आताच करा, अन्यथा आर्थिक फटका बसणार, जाणून घ्या

सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार?

सरकारच्या या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातच सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांना प्रश्न पडला आहे की, त्यांच्या खात्यात किती पैसे येणार. याचे उत्तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, ''ज्या भगिनींनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी त्यासाठी अर्ज करावा, जेणेकरून मागील तीन महिन्यांचे 4500 रुपये त्यांच्या खात्यात जमा करता येतील. सध्या ही योजना मार्च 2025 पर्यंत आहे.'' म्हणजेच सप्टेंबरमध्ये या योजेनसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्याचे पैसे म्हणजेच 4500 रुपये जमा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com