Safai Karamchari Bharti 2024 : परीक्षा न देता मिळणार सरकारी नोकरी; 23000 पदांसाठी मोठी भरती, वाचा सविस्तर

Rajasthan Bharti 2024 : स्वायत्त शासन विभागाने ही भरती आणली आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती देण्यात आलीये. सफाई कामगार या पदासाठी ही भरती आहे.
Rajasthan Bharti 2024
Safai Karamchari Bharti 2024Saam TV
Published On

सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक तरुण धडपड करत आहे. अशात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची आणि मोठी भरती समोर आली आहे. या भरतीमध्ये पात्र उमेदवारांना कोणत्याही वयाची अट नाही. तसेच कोणतेही परीक्षा देण्याची देखील दरज नाही. चला तर मग या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Rajasthan Bharti 2024
Indian Railway Bharti: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, भारतीय रेल्वेत तब्बल २४३८ पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

स्वायत्त शासन विभागाने ही भरती आणली आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती देण्यात आलीये. सफाई कामगार या पदासाठी ही भरती आहे. एकूण २३,८२० पदांसाठीची ही भरती राजस्थान या राज्यातील आहे. तुम्हालाही सफाई कर्मताऱ्याची नोकरी पाहिजे असेल तर https://lsg.urban.rajasthan.gov.in/ या संकेत स्थळाला सर्वात आधी भेट द्या. येथे तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येईल.

अर्ज करण्याची तारीख

सदर पदासाठी तुम्ही ७ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात करू शकता.तसेच अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर आहे. फॉर्म भरताना त्यात काही चुका झाल्यास त्यात दुरुस्ती करण्यासाठी ११ ते २५ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे.

या व्यक्ती अर्ज करू शकत नाहीत

सफाई कर्मचारी पदाची ही भरती फक्त राजस्थानमधील नागरिकांसाठी आहे. येथील रहिवासीच या पदासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये उमेदवारांची निवड लॉटरी नुसार केली जाणार आहे. उमेदवाराला यात सार्वजनिक सफाई कामाचा एक वर्षाचा अनुभव असणे महत्वाचं आहे. नगर पालिका, नगर परिषद यांकडून सार्वजनिक स्वच्छता केल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

वयाची अट काय?

या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराला वयाची अट देण्यात आली आहे. Safai Karamchari Bharti 2024) भरती होताना तुम्हाला १ जानेवारी २०२५ पर्यंत कमीतमी १८ वर्षे पूर्ण असली पाहिजेत. यामध्ये ४० वर्षांहून अधिक व्यक्ती अर्ज करू शकत नाहीत. आरक्षित वर्गातील उमेदवारांना ही सूट दिली जाईल.

फॉर्म फी किती?

सदर भरतीसाठी अर्ज करताना तुम्हाला ६०० रुपये फी भरावी लागेल. दिव्यांग उमेदवारांसाठी ४०० रुपये फी आहे.

Rajasthan Bharti 2024
MUCBF Recruitment:महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी;लिपिक पदासाठी सुरु आहे भरती;असा करा अर्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com