HAL Recruitment: हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरीची संधी; मिळणार २३००० रुपये पगार; जाणून घ्या सर्वकाही

Hindustan Aeronautics Limited Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये सध्या भरती सुरु आहे.
HAL Recruitment 2024
HAL RecruitmentSaam TV
Published On

HAL Recruitment

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. एचएएलमध्ये ८१ पदांसाठी भरती केली जाणार आहे. ऑपरेटर पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरीसाठी तुम्ही hal-india.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.एचएचएलच्या नॉन एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदासाठी नेहमी भरती जाहीर केली जाते. (HAL Recruitment)

HAL Recruitment 2024
DIC Recruitment: सरकारी नोकरी, 'डिजिटल इंडिया'मध्ये काम; पगार ५०,००० रुपये; जाणून घ्या सर्वकाही

या नोकरीसाठी तुम्ही ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात.याबाबत अधिकृतपणे अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २०० रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

या नोकरीसाठी ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स), ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स सी-५), ऑपरेटर (मेकॅनिकल ) स्केल डी-६, लॅब ऑपरेटर (स्केल C-5)पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांना २२००० ते २३००० रुपये वेतन मिळणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. लेखी परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. (Hindusatn Aeronautics Recruitment)

HAL Recruitment 2024
NABARD Job: दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिना ३५००० पगार; असा करा अर्ज

सध्या डीआरडीओ आणि नाबार्डमध्येही भरती सुरु आहे. डीआरडीओमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे तर नाबार्डमध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी १०वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. तर डीआरडीओमध्ये ग्रॅज्युएट, टेक अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

HAL Recruitment 2024
DRDO Job: परीक्षा नाही, थेट सरकारी नोकरी; डीआरडीओ निघाली भरती, पगार किती? पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com