Shantanu Naidu: २१ व्या वर्षी जिंकलं रतन टाटांचं मन, थेट असिस्टंटची नोकरी; कोण आहे शांतनु नायडू?

Ratan Tata Assistant Shantanu Naidu Biography: रतन टाटा यांनी या जगाचा निरोप घेतला. तरीही ते नेहमीच त्यांच्या कामातून आपल्यासोबत असणार आहेत. रतन टाटांचा सर्वात लहान असिस्टंट शांतनु नायडूने रतन टाटा यांना कसं इम्प्रेस केलं ते जाणून घेऊयात.
Shantanu Naidu
Shantanu NaiduSaam Tv
Published On

Shantanu Naidu Biography: देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांनी फक्त उद्योगविश्वात नाही तर सामाजिक कार्यात खूप मोठे नाव कमावले आहे. रतन टाटा आणि त्यांचे प्राणीप्रेम हे जगजाहीर आहे. याच प्रेमामुळे त्यांना त्यांचा जिवलग मित्र भेटला.

रतन टाटा यांचा जिवलग मित्र हा केवळ ३१ वर्षांचा आहे. शंतनु नायडू हा रतन टाटांचा फक्त मित्र नव्हे तर कुटुंबाचाच भाग आहे. (Who Is Shantanu Naidu)

Shantanu Naidu
Ratan Tata News: मैत्रीला सलाम! जिवलग दोस्त पुढे अन् रतन टाटांचे पार्थिव मागे; काळजाला भिडणारा VIDEO

रतन टाटा यांनी शांतनु नायडू यांची पहिली भेट २०१४ साली म्हणजे १० वर्षांपूर्वी झाली होती. शांतनुने डिझाइनर इंजिनियर म्हणून टाटा ग्रुप जॉइन केले होते.शांतनु नायडू एका एनजीओसोबत काम करत असल्याचे कळल्यानंतर त्यांच्यातील बोलणे वाढले. भटक्या कुत्र्यांना जेवण देण्याचा त्याचा प्रोजेक्ट ऐकून रतन टाटा भारावून गेले.रतन टाटा यांनी शांतनुच्या या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केले. त्या दोघांच्या प्राणी प्रेमामुळेच त्यांची मैत्री वाढली.

७० च्या दशकानंतर पहिल्यांदा रतन टाटा यांना सच्चा दोस्त मिळाला. शांतनुच्या Motopwas या प्रोजेक्टमुळे रतन टाटांचे लक्ष वेधून घेतले. शांतनुच्या या प्रोजेक्टमध्ये त्याने रस्त्यावरील भटक्या कुत्र्‍यांच्या गळ्यात एक बँड बांधला होता. या बँडमुळे रस्त्यावरील कुत्र्‍यांच्या गळ्यात एक विशिष्ट लाइट चमकायची. त्यामुळे अपघातापासून बचाव व्हायचा.

शांतनुच्या या प्रोजेक्टमुळे रतन टाटा खूपच भारावले. त्यांनी शांतनुने त्यांच्यासोबत काम करावे, अशी इच्छा व्यक्त केली.मीडिया रिपोर्टनुसार, शांतनु हा रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपच्या ऑफिसमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करत आहे. तसेच शांतनु हा रतन टाटा यांचा असिस्टंट होता.एवढेच नाही तर, रतन टाटा कुठेही जाऊ देत शांतनु हा नेहमी त्यांच्यासोबत असते. परदेशात जायचे असेल किंवा कोणत्या कार्यक्रमाला शांतनु हा नेहमी त्यांच्यासोबत असायचा. (Shantanu Naidu: A Friend Of Ratan Tata)

Shantanu Naidu
Ratan Tata : श्वान आजारी पडलं, टाटांनी थेट राजघराण्याचं आमंत्रण नाकारलं; आज लाडका 'गोवा' पोहोचला अंत्यदर्शनासाठी

शांतनुने यूएसएमधील Cornell Johnson Graduate School Of Management मधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्याने खूप लहान वयात खूप यश कमावले आहे. शांतनुने वयोवृद्ध लोकांसाठी गुडफेलोज नावाची कंपनी सुरु केली आहे. या कंपनीत रतन टाटा यांनी ५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच शांतनुने रतन टाटां आणि त्यांच्या आयुष्यावरील घटनेवर आय केम अपॉन अ लाइटहाउस नावाचे पुस्तक लिहले आहे. (Shantanu Naidu Education)

Shantanu Naidu
तरुणांसाठी खुशखबर! TATA कंपनीत तब्बल १ लाख पगाराच्या नोकरीची संधी; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com