Pahalgam Terror Attack : जिगरबाज काश्मिरी तरुण; हिंमतीने पुढे आला अन् हल्ल्यातील जखमीचा जीव वाचवला

Terror Attack update : जिगरबाज काश्मिरी तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काश्मीरमधील तरुण हिंमतीने पुढे आला आहे. त्याने हल्ल्यातील जखमीचा जीव वाचवला.
Pahalgam Terror Attack
Terror Attack Saam tv
Published On

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झालाय. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात निष्पाप लोकांचा जीव गेल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. भारतातील अनेकांनी हल्ल्याचा निषेध नोंदवला जात आहे. दहशतवाद्यांनी अगदी जवळून पर्यटकांना गोळ्या झाडून संपवलं आहे. तर काही दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये एकच भीती पसरली. या परिस्थितीत एका काश्मिरी तरुणाने धाडस दाखवलं. काश्मीरच्या तरुणाने हिंमतीने पुढे येऊन एका जखमीचा जीव वाचवला. या काश्मिरी तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेनंतर अनेक जण सैरावैरा पळू लागले. या गोळीबारात अनेकांनी जीव गमावले. पहलगाममधील हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर काही पर्यटक जीव वाचवण्यसाठी लपून बसले. या दहशतवादी हल्ल्यात काही काश्मिरी तरुण मदतीला धावले आहेत.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Attack : भयंकर! जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा पहिला व्हिडिओ आला समोर; सर्व काही सेकंदात घडलं

पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरून सफर घडवून आणण्याऱ्या एका स्थानिक तरुण मदतीला पुढे आला होता. त्याने दहशतवाद्यांशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. घोडेवाला तरुण निडरपणे दहशतवाद्यांना भिडला. त्याने थेट दहशतवाद्यांच्या हातून रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या तरुणाचा जीव दहशतवाद्यांनी घेतला. त्यामुळे काश्मिरी तरुणही पर्यटकांना मदत करत असल्याचे समोर येत आहे.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील नवदाम्पत्य काश्मीरमध्ये अडकले, पण अन्य पर्यटकांना देताहेत मदतीचा हात

काश्मीरमधील एका जिगरबाज तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'एक जिगरबाज काश्मिरी तरुणाने पाठीवर जखमी पर्यटकाला घेतलं आहे. काश्मिरी तरुण धावत पळत जखमी पर्यटकाला उपचारासाठी डोंगरातून पळत आहे. तरुणाच्या पाठीवरील पर्यटक जखमी असल्याचे दिसत आहे. काश्मिरी तरुणाच्या या धाडसाचं कौतुक नेटकऱ्यांकडून केलं जात आहे.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack : ती ठरली आयुष्यातील शेवटची सहल; दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील कुटुंबाचा आधारवड हरपला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com