Pahalgam Terror Attack : ती ठरली आयुष्यातील शेवटची सहल; दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील कुटुंबाचा आधारवड हरपला

Pahalgam Terror Attack News in Marathi : दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील एकाचा मृत्यू झाला आहे. अतुल मोने असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
Terror Attack
Pahalgam Terror AttackSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

डोंबिवली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यातील बैसरन खोऱ्यात दहशतवादी हल्ला झालाय. दहशतवादांच्या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत एकूण २७ जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये डोंबिवलीतील एकाचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील इंजिनीअरचा मृत्यू झाला आहे.

जम्मू काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचा मृत्यू झाला आहे. अतुल मोने डोंबिवली पश्चिमेकडे ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहत होते. अतुल श्रीकांत मोने कुटुंबासह फिरण्यासाठी काश्मीर पेलगम येथे गेले होते. मुलगी, बायको यांच्यासह त्यांचे नातेवाईकांची तीन कुटुंब गेल्याची माहिती मिळत आहे. अतुल मोने रेल्वेमध्ये परेल वर्क शॉप सेक्शन इंजिनियरपदी कार्यरत होते. या घटनेची माहिती मिळताच मोने यांचे नातेवाईक काश्मीरला रवाना झाले आहेत.

Terror Attack
Shocking Incident : जमिनीचा वाद, भर बाजारात माय-लेकीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील कर्वेनगरचे रहिवासी हल्ल्यात जखमी

पुण्याच्या कर्वेनगरमधील काही लोक काश्मीरला गेले होते. काश्मीर हल्ल्यात पुण्यातील ५ जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुण्यातील आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे, संगीता गणबोटे हे नागरिक काश्मीरला फिरायला गेले. यातील जगदाळे कुटुंबीय हे कर्वेनगर परिसरात राहणारे आहेत. तर गणबोटे कुटुंबीय हे पुण्यातील रास्ता पेठेतील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Terror Attack
Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार, कोणत्या भागाचा समावेश?

पुण्यातील संतोष जगदाळे जखमी

काश्मीरच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे जखमी झाले आहेत. या घटनेवर संतोष जगदाळे यांच्या जाऊ म्हणाल्या की, माझे दीर संतोष जगदाळे,त्यांची पत्नी प्रगती जगदाळे आणि मुलगी आसावरी जगदाळे हे तीन दिवसांपूर्वी काश्मीर फिरायला गेले होते. संतोष जगदाळे यांना गोळी लागून ते जखमी झाले आहेत. दोन्ही महिला सुरक्षित आहेत. आम्हाला ही बाब माध्यमातून समजली. जाऊ आणि मुलगी सुरक्षित असून संतोष जगदाळे यांच्यावर उपचार सुरू आहेत'.

Terror Attack
Saam TV Poll : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? लोकांना काय वाटतंय? पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com