Maharashtra Politics
Raj Thackeray And Uddhav Thackeray AllianceSaam Tv News

Saam TV Poll : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? लोकांना काय वाटतंय? पाहा व्हिडिओ

Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही नेत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Published on

उद्धव आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. दोन्ही बंधू एकत्र येणाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरेंच्या युतींच्या चर्चांना महत्व प्राप्त झालं आहे. दोन्ही ठाकरेंच्या युतीबाबत लोकांना काय वाटतंय, याबाबत साम टीव्हीने एक पोल घेतला. या पोलमध्ये दोन्ही ठाकरेंच्या युतीला झुकतं माप मिळालं आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना युतीची साद दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला. उद्धव ठाकरे यांनी किरकोळ भांडणं बाजूला ठेवून एकत्र यायला तयार असल्याचं म्हटलं. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी युतीवर सकारात्मक भाष्य केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Maharashtra Politics
Ambernath Firing : महाराष्ट्र आहे की बिहार? दिवसाढवळ्या बिल्डरच्या घरावर गोळीबार, ठाणे जिल्हा हादरला

दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याच्या भूमिकेवर काही मनसे पदाधिकाऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत मनसे नेते, पदाधिकाऱ्यांनी बोलू नये, अशा सूचना केल्या आहेत. राज सध्या परदेशात असून तेथून नेत्यांना सूचना दिल्या आहेत. ते मुंबईत आल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंच्या चर्चेवर मराठी माणसांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Maharashtra Politics
Rajeshwari kharat : दारु, हॉटेलला जेवण आणि साहेब...आता धर्म शिकवायला आलेत; राजेश्वरीचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

सामच्या पोलनुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती व्हावी, असं ७८ टक्के लोकांना वाटत आहे. तर १६ टक्के लोकांना युती होऊ नये, असं वाटत आहे. तर ६ टक्के लोकांनी सांगता येत नाही, असं उत्तर दिलं आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीचा काय परिणाम होणार?

ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मराठी माणसाला व्यासपीठ मिळू शकते. तर मराठी अस्मितेचा कमकुवत झालेला मुद्दा पुन्हा एकदा बळकट होईल. दोन्ही ठाकरेंना मतपेटीतून फायदा होईल. दोन्ही ठाकरेंना मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरी भागांत याचा फायदा होईल. मुंबई महापालिकेवरही ठाकरेंना वर्चस्व राखण्यात मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com