Ambernath Firing : महाराष्ट्र आहे की बिहार? दिवसाढवळ्या बिल्डरच्या घरावर गोळीबार, ठाणे जिल्हा हादरला

Ambernath Firing News : अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या बिल्डरच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.या घटनेने ठाणे जिल्हा हादरला आहे.
Ambernath
Ambernath Firing Saam tv
Published On

अजय दुधाणे, साम टीव्ही

अंबरनाथ : राज्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एका बिल्डवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. चेंबूरमधील घटनेनंतर आता ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

Ambernath
Devendra Fadnavis :...तर तामिळ किंवा गुजराती भाषा शिकावी लागेल; हिंदी सक्तीच्या मुद्दयावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दोन गोळ्या झाडून दुचाकीवरून झालेले हल्लेखोर पसार झाले आहेत. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बांधकाम व्यावसायिक पनवेलकर यांच्या घरावर सोमवारी दुपारी अडीच वाजता गोळीबार झाला. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर दोघांनी गोळ्या झाडून पळ काढलाय.

Ambernath
Maharashtra Politics : ठाकरे बंधूंनंतर आणखी एक नवे समीकरण? केंद्रीय मंत्र्यांची ऑफर, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या हुतात्मा चौकाजवळ उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांचं सीताई सदन हे घर आहे. पनवेलकर यांच्या घराबाहेर आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर आले. त्यांनी पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन गोळ्या झाडत तिथून पळ काढला. गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Ambernath
Maharashtra Politics : राज ठाकरेंसोबत जाण्याआधी रश्मी वहिनींना विचारलं का? भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंना डिवचलं

गोळीबाराची संपूर्ण घटना पनवेलकर यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. याप्रकरणी आता शिवाजीनगर पोलीस आणि क्राईम ब्रँचची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ गोळीबाराची घटना घडली होती. चेंबूरमध्ये बिल्डरच्या कारवर गोळीबार झाला होता. या गोळीबारात एक जण जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं. चेंबूरच्या घटनेनंतर आता अंबरनाथमध्ये गोळीबार घडल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Ambernath
Maharashtra Politics : राज ठाकरेंसोबत जाण्याआधी रश्मी वहिनींना विचारलं का? भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंना डिवचलं

सीसीटीव्हीमध्ये दिसत काय आहे?

अंबरनाथ गोळीबार प्रकरणाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या सीसीटीव्हीत दिसत आहे की, 'रस्त्यावर नागरिकांची वर्दळ आहे. रस्त्यावर येजा सुरु आहे. एका रिक्षातून काही महिला उतरत आहेत. त्याचवेळी एक दुचाकी येते. या दुचाकीतील दोघांकडून उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करतात. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com