
अजय दुधाणे, साम टीव्ही
सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली असून, सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आत्महत्येपूर्वी पीडित महिलेने आधी एक व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ तिच्या बहिणींना पाठवला. नंतर आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका विवाहितेच्या माहेरच्यांनी घेतली आहे.
विधी राजेंद्र गायकवाड असं या मृत विवाहित महिलेचं नाव होतं. या विवाहित महिलेचं राजेंद्र गायकवाड या व्यक्तीशी २०१३ साली लग्न झालं होतं. त्यांचे पती राजेंद्र हे आखाती देशामध्ये नोकरीला असून, पीडित महिला सासू-सासरे, दीर आणि भावजय यांच्यासह अंबरनाथ पूर्वेतील रॉयल पार्कमध्ये वास्तव्याला होत्या. मात्र, मागील काही दिवसांपासून सासरचे लोक त्यांचा छळ करत होते. याच छळाला कंटाळून अखेर विधी यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचे ठरवलं.
शनिवारी विवाहित महिलेनं एक व्हिडिओ शूट केला. तिने हा व्हिडिओ आपल्या बहिणींना पाठवला. नंतर गळफास घेत आत्महत्या केली. हा व्हिडिओ पाहून त्यांच्या बहिणींनी विधीला फोन केला. मात्र, तिने काही फोन उचलला नाही. त्यानंतर मृत महिलेच्या बहिणींनी विधीच्या घरात धाव घेतली. त्यानंतर पीडित महिलेने आत्महत्या केल्याचं समोर आलं.
विधीच्या माहेरच्या मंडळींनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. तसेच जो पर्यंत न्याय मिळत नाही. सासरच्या मंडळींना अटक होत नाही, तो पर्यंत मृत महिलेचे अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका माहेरच्या मंडळींनी घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.