Raj-Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत जाणार नाहीत; शिवसेनेच्या नेत्यानं सांगितलं कारण

MNS-Shiv Sena Alliance Unlikely Sanjay Shirsat: राज ठाकरे यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये शिवसेनेसोबत युतीबाबत मोठं विधान केल्यानंतर, राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Shivsena
ShivsenaSaam
Published On

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये शिवसेनासोबतच्या युतीवर मोठं विधान केलं होतं. त्यानंतर मनसे आणि शिवसेना एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या मुद्द्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राज ठाकरे यांनी जी भूमिका आज घेतलेली आहे, ती काही नवीन नाही. यापूर्वीही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती, आणि त्यावेळी ते म्हणाले होते की, एका हाताने टाळी वाजत नाही, त्यांच्या मागच्या प्रस्तावाचे काय झाले? तोच अनुभव त्यांना याही वेळी येईल', असं मंत्री संजय शिरसाट म्हणालेत.

राज ठाकरे यांची भूमिका जुनीच - शिरसाट

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे ठेवलेल्या प्रस्तावावर संजय शिरसाट म्हणाले, 'राज ठाकरे यांनी जी भूमिका आज घेतलेली आहे. ती काही नवीन नाही. यापूर्वी त्यांनी अशी भूमिका घेतली होती, आणि त्यावेळी ते असे म्हणाले होते की, एका हाताने टाळी वाजत नाही. त्यांच्या मागच्या प्रस्तावाचे काय झाले, तोच अनुभव त्यांना याही वेळी येईल. पक्ष चालवताना किंवा एखादी संघटना चालवताना जो संयम असावा लागतो, जे धाडस असावा लागतो ते राज ठाकरेंमध्ये निश्चित आहे. परंतु युतीमध्ये गेल्याने काय परिणाम होईल याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. कारण उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणे उचित वाटत नाही'

Shivsena
Jalgaon Crime: 'बॉडी मसाजसोबत अनैतिक संबंधासाठी ऑफर', मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री; ४ महिलांची सुटका

उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युती करण्यास तयार होणार नाही

'महाविकास आघाडीवरून काय झालं..? युती केली, शरद पवार आणि शिवसेनेचं जमलं नाही. आता त्याचं राज ठाकरे यांच्याशी तर जमणारच नाही. कारण राज ठाकरे यांना सर्व माहिती असल्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसोबत युती करण्यास तयार होणार नाही, असं मला वाटतं', असं मत शिरसाट यांनी व्यक्त केलं.

Shivsena
Ajit Pawar: मुंबईजवळ आता तिसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेमकं कुठे होणार? अजित पवारांनी थेट सांगून टाकलं

उद्धव ठाकरे प्रस्ताव स्वीकारणार नाही

'राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिला असेल तरी उद्धव ठाकरे स्वीकारणार नाही, कारण त्यांना वेगळं राहायचं आहे', असंही संजय शिरसाट म्हणालेत. 'भविष्यातही उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत जाणार नाही, कारण त्यांचे विचार वेगळे आहेत. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस किंवा इतर काही घटक पक्ष त्यांच्यासोबत जाण्यास स्वारस्य आहे', असंही शिरसाट म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com