Ajit Pawar: मुंबईजवळ आता तिसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेमकं कुठे होणार? अजित पवारांनी थेट सांगून टाकलं

Mumbai to Get Third Airport in Navi Mumbais Wadala Area: मुंबईला आता लवकरच तिसरे विमानतळ मिळणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Saam Tv
Published On

मुंबईला आता लवकरच तिसरे विमानतळ मिळणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या मान महाराष्ट्राचा, सन्मान महाब्रँड्स या कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली. पवार यांनी याआधीही विधानसभेत राज्याचे अर्थसंकल्प सादर करताना मुंबईला तिसरे विमानतळ मिळणार असल्याची घोषणा केली होती. हे विमानतळ वाढवण बंदराजवळ तयार करण्यात येणार असून, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील एक स्थानकही याच बंदराजवळ होणार असल्याचंही समजते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की, 'वाढवण येथे लवकरच मुंबईतील तिसरं विमानतळ उभारण्यात येणार आहे. या तिसऱ्या विमानतळामुळे मुंबई तसेच उपनगरातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. मुंबईत आता तीन विमानतळे असतील, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विमानतळ', असं अजित पवार यांनी सांगितलं. वाढती हवाई वाहतूक, व्यापारी आणि औद्योगिक गरज लक्षात घेता हा निर्णय अत्यंत गरजेचं असल्यांचही ते म्हणाले.

Ajit Pawar
Sanjay Raut: 'मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका', संजय राऊत कडाडले

लाडकी बहीण योजना बंद करणार नाही

सकाळ माध्यम समूहाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचा सरकारचा निर्धार आहे. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी ४० ते ४५ हजार कोटी रूपये खर्च झाले आहेत. यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच आम्ही काटकसर देखील करत आहोत', असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Bhiwandi: मौलवीला मुलाशी संबंध ठेवताना पाहिलं, १७ वर्षीय मुलाचा गळा दाबून हत्या अन् मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरलं; भिवंडी हादरली

हिंदी, त्यात काय वाईट आहे?

राज्यातील शाळेतील पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवणं अनिवार्य करण्यात आले आहे. हिंदी भाषा सक्तीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, 'हिंदी, त्यात काय वाईट आहे? स्पर्धेच्या युगात मुले टिकायला हवीत, यासाठी ही तिसरी भाषा आहे. मराठी भाषकांना हिंदी शिकणे सोपे जाते', असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com