Bhiwandi: मौलवीला मुलाशी संबंध ठेवताना पाहिलं, १७ वर्षीय मुलाचा गळा दाबून हत्या अन् मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरलं; भिवंडी हादरली

Bhiwandi Maulvi Arrested for killing Teenager Over Blackmail: भिवंडीमध्ये एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका मौलवीने एका मुलाची दृश्यम स्टाईल हत्या केली होती.
Bhiwandi Crime
Bhiwandi CrimeSaam
Published On

भिवंडीमध्ये एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका मौलवीने एका मुलाची दृश्यम स्टाईल हत्या केली होती. नंतर त्याच्या शरीराचे तुकडे करून अवशेष त्याच्याच किराणाच्या दुकानात पुरले होते. ही धक्कादायक घटना २०२० साली घडली होती. मृत मुलाने मौलवीला एका मुलासोबत दुष्कृत्य करत असताना पाहिलं होत. ही बाब कुणाला कळू नये, म्हणून मौलवीने मुलाची हत्या केली होती. याच प्रकरणाचा छडा पोलिसांकडून लागला असून, आरोपी मौलवीला पोलिसांनी ताब्यात घेत त्याचा भंडाफोड केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मृत तरुणाचे नाव शोएब शेख ( वय वर्ष १७ ) असे आहे. तो भिवंडीतील नवी बस्ती, नेहरू नगर भागात राहत होता. तर गुलाम रब्बानी शेख असे आरोपीचे नाव आहे. तो मशिदीत अजान देण्याचं काम करत होता. त्याचबरोबर त्याचे किराणा मालाचे दुकानही होते. एकेदिवशी शोएबने गुलाम रब्बानीला एका मुलासोबत दुष्कृत्य करत असताना पाहिलं.

Bhiwandi Crime
Parbhani: दुचाकीला टिप्परची जबर धडक, उपसरपंचाचा जागीच मृत्यू, बहिणीसह मुलगा गंभीर जखमी

शोएब सर्वांना सांगेल या भीतीने आरोपी त्याला पैसे देत राहिला. शोएब देखील त्याच्या किराणा मालाच्या दुकानातून फुकट वस्तू घेऊन जात होता. हळूहळू शोएब पैशांची अधिक मागणी करू लागला. पैसे उकळण्यास सुरुवात केल्यानंतर मौलवीला या गोष्टीचा राग आला. त्याने शोएबचा काटा काढायचे ठरवले.

मौलवीने शोएबला दुकानात बोलावून घेतलं. त्यानंतर त्याचा गळा दाबून त्यांची हत्या केली आणि शरीराचे तुकडे करून कचऱ्यात फेकले आणि काही तुकडे किराणा मालाच्या दुकानाखाली गाडले. काही अवशेष जमिनीतून बाहेर येत असल्यामुळे त्याने दुकानाला टाईल्स बसवले.

Bhiwandi Crime
MNS Raj Thackeray: हिंदी सक्तीविरोधात मनसे 'मराठी जागर परिषद' भरवणार, राज ठाकरेंचे बैठकीत आदेश

२० नोव्हेंबर २०२० रोजी एकुलता एक मुलगा हरवला म्हणून कुटुंबाने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. मात्र, शोएब काही सापडला नाही. २०२३साली अचानक कुणीतरी शोएबच्या कुटुंबाला मौलवीने हत्या केली असल्याचं सांगितला. कुटुंबाने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. मौलवी फरार होऊन दिल्लीमार्गे उत्तराखंडच्या रूडकी जिल्ह्यात गेला. ओळख बदलून मौलवी म्हणून काम करू लागला. मात्र, ठाणे क्राईम प्रॉपर्टी सेलच्या टीमने त्याला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com