Mumbai Chembur Firing : मुंबई हादरली! दोघे दुचाकीवरून आले, भर रस्त्यात केला बिल्डरवर गोळीबार

Mumbai Chembur Firing update : मुंबईच्या चेंबूरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकावर गोळीबार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Chembur Firing
Mumbai Chembur Firing Saam tv
Published On

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबईत गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईच्या चेंबूरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या चेंबूर विभागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एक जण जखमी झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

Chembur Firing
CNG Price Hike : महागाईचा आणखी एक दणका; पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजी गॅसच्या दरात वाढ, किती रुपयांनी वाढले दर?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या चेंबूरमधील मैत्रीपार्क भागात बिल्डवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईच्या बिल्डरवर गोळीबार करण्यात आला आहे. दोघे जण दुचाकीवरून आले. त्यानंतर त्यांनी बिल्डरवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. गोळीबाराची घटना माहीत होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Chembur Firing
Agra woman : लय मोठा गडबड घोटाळा! ५ वेळा संतती नियमन, तरीही ३० महिन्यांत २५ वेळा आई बनली

मुंबईतील गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. चेंबूरच्या डायमंड गार्डन सिग्नलजवळ ५० वर्षीय सद्रुद्दीन खान यांच्यावर गोळीबार झाला. सायन पनवेल महामार्गाने पनवेलला जाताना दुचाकीवर असलेल्या दोघांनी गोळीबार केला. दोघांनी गोळीबार केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

Chembur Firing
Shocking : राज्यात आणखी एका रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड; ४०००० रुपयांसाठी सहा तास महिलेचा मृतदेह अडवून ठेवला

सद्रुद्दीन खान यांच्यावर बुधवारी रात्री ९.५० वाजता गोळीबार झाला. बेलापूरच्या पारसिक हिल परिसरात राहणारे सद्रुद्दीन यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. दोघांनी केलेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला झेन रुग्णालयात दाखल केले. सध्या या जखमीची प्रकृती स्थिर आहे. मुंबई सारख्या शहरात गोळीबाराची घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com