
उत्तर प्रदेशच्या आग्र्यामधून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. आग्र्याच्या फतेहाबादच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रावर एक महिला अडीच वर्षात किमान २५ वेळा आई बनल्याचं उघड झालं. या महिलेची ५ वेळा संतती नियमन प्रक्रिया झाल्यानंतरही आई बनली. जननी सुरक्षा योजना आणि महिला संतती नियमन प्रोत्साहन योजनेचा पैसा लाटण्यासाठी महिलेने हा घोटाळा केल्याचं उघड झालं.
आरोग्य विभागाचे सीएचसी फतेहाबादचं ऑडिट केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. ऑडिट टीमने तपास केला. त्यानंतर टीमचे सदस्य चक्रावून गेले. एकाच महिलेच्या नावावर २५ वेळा गर्भधारणा आणि पाच वेळा संतती नियमन केल्याची नोंद आहे. सरकारी योजनेच्या नावाखाली महिलेच्या खात्यात एकूण ४५००० रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचेही उघड झाले.
ऑडिट टीमला ही बाब कळाल्यानंतर सीएमओ आगरा डॉ. अरुण श्रीवास्तव यांना सूचना दिली. डॉ. श्रीवास्तव यांनी स्वत: केंद्रावर पोहोचून प्रकरण गांभीर्याने घेत चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणात कर्मचारी सामील आहेत का, हे देखील तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेश सरकारकडून दोन प्रमुख योजना चालवल्या जातात. जननी सुरक्षा योजना आणि संतती नियमन योजनेत प्रसुतीनंतर १४०० रुपये आणि आशा वर्करला ६०० रुपये दिले जातात. संतती नियमन केल्यानंतर २००० आणि आशा वर्करला ३०० रुपये मिळतात. संपूर्ण रक्कम अवघ्या ४८ तासांत ट्रान्सफर केली जाते. या दोन्ही योजनेच्या आडून मोठा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे.
योजनेच्या आडून महिलेने सरकारची ४५००० रुपयांची फसवणूक केली. आता महिलेच्या कारनाम्यामागे आणखी कोण आहे? याचा तपास केला जात आहे. तसेच कोणत्या कर्मचाऱ्याच्या मदतीने घोटाळा केला का, याचा देखील तपास केला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.