
डोमिनिकन रिपब्लिकमध्ये मंगळवारी सकाळी नाईट क्लबमध्ये छत कोसळल्याची घटना घडली. मेरेंग्यू कॉन्सर्टदरम्यान ही भयंकर घटना घडली. या क्लबमध्ये राजकीय नेते, खेळाडू, सेलिब्रटी सहभागी झाले होते. संपूर्ण दुर्घटनेत १०० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर १६० लोक जखमी झाले आहेत. छत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट माहितीनुसार, सँटो डोमिंगोच्या जेट सेट नाइट क्लबमध्ये ही दुर्घटना घडली. छताखाली दबल्या गेलेल्या जिंवत लोकांचा शोध सुरु आहे. दुर्घटना घडल्यानंतर तब्बल १२ तासांपासून बचाव कार्य सुरु आहे. अग्निशमन दलाचे जवानही बचाव कार्यात सामील झाले आहेत. नाईट क्लबमधील ढिगारा उचलण्यासाठी लाकडी तुकड्याचा वापर केला जात आहे. सिमेंटच्या भिंती तोडण्यासाठी ड्रिलिंगचा वापर केला जात आहे.
मेंडेज यांनी घटना घडल्यानंतर म्हटलं होतं की, 'आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कमीत कमी १६० लोक जखमी झाले आहेत. आम्हाला ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा आवाज ऐकू येत आहे'. मेंडेज यांनी प्राथमिक माहिती दिली होती. पुढे काही वेळानंतर मृतांचा आकडा वाढल्याचं पाहायला मिळालं.
नाईट क्लबचं छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक दिग्गजांचा मृत्यू झाला आहे. एका प्रातांचे गर्वनर (एमएलबी) प्लेयरो ऑक्टोवियो डोटेल यांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी ५१ वर्षीय डोटेल यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बेसबॉल खेळाडू टोनी एनरिक ब्लैंको कॅबरेरा याचाही मृत्यू झाला आहे. आमदार ब्रे वर्गास हे देखील जखमी झाले आहेत.
छत कोसळल्यानंतर एका गायकाचाही जागीच मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेत क्बच्या मॅनेजरचाही मृत्यू झालाय. या घटनेनंतर परिसरात एक खळबळ उडाली. लोक सैरावैरा पळू लागले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कमीत कमी १६० लोक जखमी झाले आहेत. तर आतापर्यंत ढिगाऱ्याखाली दबलेल्या ४०० लोकांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.