Agarwal Family's MPG Club Sealed: विशाल अग्रवालला सातारा जिल्हा प्रशासनाचा दणका, जाणून घ्या प्रकरण (Video)

vishal agrawal mpg hotel sealed : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सातारा जिल्ह्यात विशेषत: महाबळेश्वर येथे अनधिकृत बांधकामांना थारा नाही हे अनेक वेळा कारवाईतून दाखवून दिले आहे.
vishal agrawal mpg hotel sealed by satara administration in mahabaleshwar
vishal agrawal mpg hotel sealed by satara administration in mahabaleshwarSaam Digital
Published On

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलास चार चाकी चालविण्यास देण्या-या विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर मधील हॉटेल जिल्हा प्रशासनाने आज (शनिवार) सील केले. या हाॅटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार अभय हवलदार यांनी केली हाेती. त्याची दखल घेत प्रशासनाने कारवाई केल्याचे हवलदार यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

अभय हवलदार म्हणाले जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात हे हॉटेल सील केले असले तरी माझी मागणी या हॉटेलमधील अनधिकृत जे बांधकाम झाले आहे ते पूर्णपणे पाडण्यात यावं अशी आहे. जे अधिकृत आहे ते ठेवा त्याबाबत आमची हरकत नाही असेही हवलदार यांनी नमूद केले.

vishal agrawal mpg hotel sealed by satara administration in mahabaleshwar
12 वी शिकला अन् दवाखाना थाटला, गर्भपात प्रकरणात हसनाबादमधील बाेगस डाॅक्टरला अटक

अभय हवलदार म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवणार असे आश्वासन काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी बाेलताना दिले हाेते. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर या हॉटेलमधील अनधिकृत बांधकाम पाडले जावे असेही हवलदार यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

vishal agrawal mpg hotel sealed by satara administration in mahabaleshwar
Prithviraj Chavan On Porsche Car Case: महाराष्ट्रात श्रीमंतांसाठी वेगळा कायदा; पाेर्शे अपघात प्रकरणावरुन पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर राेख

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com