- रणजीत माजगावकर
पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पाेर्शे कार अपघातानंतर पाेलिसांची वागणुक, रुग्णालयाची हलगर्जीपणा यामुळे सगळेच संशयास्पद आहे. मुळातच महाराष्ट्रमध्ये भ्रष्टाचार सरकार कार्यरत आहे. अधिकारी पैसे देऊन खुर्चीवर बसलेत. त्यामुळेच हे सगळं घडतय अशी टिप्पणी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पाेर्शे कार अपघात प्रकरणावर बाेलताना केली.
आमदार पृथ्वीराज चव्हाण हे आज काेल्हापूर येथे आले हाेते. त्यांनी (कै.) आमदार पी. एन पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांनी माध्यमांशी बाेलताना आमदार चव्हाण म्हणाले आमदार पी.एन. पाटील हे काॅंग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून गणले जात.
सहकारात त्यांनी चांगले काम केले. काँग्रेसवाढीसाठी त्यांचे माेलाचे याेगदान राहिले. जेष्ठत्वाने त्यांना मंत्री मिळायाला पाहिजे होते, पण दुर्दैवाने मिळाले नाही. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा होती. दरम्यान लोकसभा निवडणूकीत गावं आणि गावं त्यांनी पिंजून काढले.
पृथ्वीराज चव्हाण यांना पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघाताविषयी छेडले असता त्यांनी श्रीमंत लोकासाठी वेगळा कायदा सुरु आहे आणि गरीब जनतेसाठी वेगळा हे महाराष्ट्रात आपण पाहत आहे. यामुळेच लवकरच भ्रष्टाचारी सरकार सत्तेतून खाली आल्याचे आपणांस पाहयला मिळेल असा विश्वास आमदार चव्हाण यांनी लाेकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बाेलताना व्यक्त केला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.