Rajeshwari kharat : दारु, हॉटेलला जेवण आणि साहेब...आता धर्म शिकवायला आलेत; राजेश्वरीचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

Rajeshwari kharat News : धर्मांतराची पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी राजेश्वरीला ट्रोल केले होते. या ट्रोलिंगनंतर राजेश्वरी खरातने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
Rajeshwari kharat News
Rajeshwari kharat Saam tv
Published On

नागराज मंजुळे यांचा गाजलेला चित्रपट 'फँड्री'त शालूची मुख्य भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राजेश्वरी खरातने काही तासांपूर्वी ख्रिश्चन धर्मातील बाप्तिस्मा केल्याचा फोटो पोस्ट केला होता. राजेश्वरी खरातला या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं. नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर आता राजेश्वरीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

राजेश्वरी खरात सोशल मीडियावर सक्रिय असते. राजेश्वरी तिचे फोटो आणि रील्स सोशल मीडियावर शेअर करत असते. काही तासांपूर्वी राजेश्वरीने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये राजेश्वरी धर्मांतर करत असल्याचे दिसत आहे. यावरून नेटकऱ्यांनी राजेश्वरीला ट्रोल केलं. तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शेकडो कमेंट्स केल्या. नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला राजेश्वरीने मोजक्या शब्दात उत्तर दिले आहे .

Rajeshwari kharat News
Vaibhav Suryavanshi : छोटा पॅक बडा धमाका! 14 वर्षांच्या मुलाने रचला आयपीएलमध्ये इतिहास, VIDEO

अभिनेत्री राजेश्वरी खरातने काय म्हटले?

अभिनेत्री राजेश्वरी खरातने ट्रोलर्सला फेसबुक पोस्ट करत उत्तर दिलं आहे. 'निवडणुका, प्रत्येकी 500 रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू, हॉटेलला जेवण, साहेब, दैवत, देव माणूस वगैरे. हे आज धर्म/जात शिकवायला आले आहेत. तुमचं स्वागत आहे. कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात. तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे आहेत, असे उत्तर राजेश्वरी खरातने दिलं आहे.

Rajeshwari kharat News
Ambernath Firing : महाराष्ट्र आहे की बिहार? दिवसाढवळ्या बिल्डरच्या घरावर गोळीबार, ठाणे जिल्हा हादरला

राजेश्वरी खरात पुढे म्हणाली, माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे. मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्वीकारली जावी एवढी विनंती'. राजेश्वरीने पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काहींनी राजेश्वरीच्या पोस्टवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामुळे राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com