Vaibhav Suryavanshi : छोटा पॅक बडा धमाका! 14 वर्षांच्या मुलाने रचला आयपीएलमध्ये इतिहास, VIDEO

Vaibhav Suryavanshi Latest news : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत लखनऊने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला... पण राजस्थानच्या पराभवापेक्षा चर्चा रंगलीय ती अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी या खेळाडूची... विशेष म्हणजे गुगलचे सीएओ सुंदर पिचईदेखील वैभवचे फॅन बनलेत..
Vaibhav Suryavanshi News
Vaibhav SuryavanshiSaam tv
Published On

राजीव कासले, साम टीव्ही

वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पदार्पणातच पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला… या दणकेबाज षटकारावर स्टेडियममध्ये टाळ्या आणि शिट्ट्या पडल्या नसत्या तर नवलंच… अख्खं स्टेडियम वैभव… वैभव… वैभव… च्या नावाने गुंजत होतं. भारतीय क्रिकेटला नवा तारा गवसल्याची ती हाळी होती... आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करत वैभवने इतिहास रचला.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळाताना वैभवने 20 चेंडूत 34 धावा केल्या... यात त्याने 2 चौकार आणि 3 खणखणीत षटकार लगावले... त्याच्या या खेळीचं अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केलंय... आता तर गुगलचे सीईओ सुंदर पिचई देखील वैभवचे फॅन बनले आहेत.. एक ट्विट करत सुंदर पिचई यांनी वैभवचं कौतुक केलंय...

Vaibhav Suryavanshi News
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार, नेमका कुणी केलाय दावा? पाहा व्हिडिओ

आज सकाळी झोपेतून उठताच आठवीत शिकणाऱ्या एका मुलाला आयपीएलमध्ये खेळताना पाहिलं, त्याने खूप जबरदस्त सुरुवात केली.

बिहारच्या समस्तीपूरमध्ये वैभवचा जन्म झाला... चार वर्षांचा असल्यापासून वैभवला क्रिकेटची आवड निर्माण झाली... वैभवचे वडिल संजीव यांनी त्याच्यासाठी घराच्या मागे एक मैदान तयार केलं होतं. वयाच्या नवव्या वर्षी समस्तीपूरच्या एका क्रिकेट अकादमीत दाखल केलं. त्यानंतर वैभवने मागे वळून पाहिलंच नाही.

Vaibhav Suryavanshi News
Maharashtra Politics : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याने राहुल गांधींचा 'हात' सोडला; भाजप प्रवेशाची तारीख ठरली

कोण आहे वैभव?

बिहारच्या एका छोट्याशा खेड्यात वैभवचा जन्म झाला

वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी वैभवने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं

रणजी ट्रॉफीत खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला

2024 मध्ये अंडर 19 स्पर्धेत भारतीय संघात स्थान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 58 चेंडूत दमदार शतक

आयपीएलमध्ये चांगली सुरुवात झालीय, आता देशासाठी खेळताना पाहायचं असल्याचं वैभवच्या वडिलांचं स्वप्न आहे.

आयपीएलमध्ये दमदार पदार्पणानंतर त्याच्या समस्तीपूर गावात आनंदाचं वातावरण आहे... पेढे आणि गुलाबजाम भरवत स्थानिकांनी आनंद व्यक्त केला.. हा आमच्यासाठीच नाही तर बिहार आणि संपूर्ण देशासाठी ही गौरवाची बाब असल्याचं त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितलंय.

Vaibhav Suryavanshi News
Shirish Valsangkar : न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

राजस्थान रॉयल्सने वैभववर 1 कोटी 10 लाखांची बोली लावत संघात घेतलं... पण सुरुवातीच्या 7 सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. लखनऊ विरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार संजू सॅमसन जखमी झाला आणि वैभवला थेट सलामीला खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं वैभवने सोनं केलं. आता ही केवळ सुरुवात आहे, भविष्यात वैभवला आणखी मोठा पल्ला गाठायचाय आणि त्याची झलक वैभवने दाखवून दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com