Shocking Incident : जमिनीचा वाद, भर बाजारात माय-लेकीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

chhatrapati sambhaji nagar News : जमिनीच्या वादातून दोन महिलांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे .
 chhatrapati sambhaji nagar
chhatrapati sambhaji nagar News Saam tv
Published On

Shocking Incident in chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भर रस्त्यात मायलेकीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून माय-लेकीला आठ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. माय-लेकीला मारहाण झाल्यानंतर परिसरात एकच गर्दी झाली. मारहाणीची घटना बाजारपेठेतील एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील बुढीलाईनच्या बाजारपेठात मायलेकींना मारहाण झाल्याची घटना घडली. मायलेकींना बाजारपेठेतच बेसबॉल स्टिक, लाठ्या काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली आहे. आयेशा शेख , जमीला शेख अशी अमानुष मारहाणीत जखमी झालेल्या मायलेकींचे नाव आहे. आठ जणांच्या टोळक्याने महिलांना मारहाण केली.

 chhatrapati sambhaji nagar
Terror attack in jammu and kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला

शहरातील बुढीलाईनच्या भर बाजारात दोन्ही महिलांना जबर मारहाण झाली. दोन्ही महिलांना मारहाण झाल्यानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली. मारहाणीनंतर रस्त्यावरील नागरिक धावत पळत घटनास्थळी पोहोचले. यावेळी काहींनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. तर मारहाणीची घटना बाजारपेठेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील सिटीचौक पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 chhatrapati sambhaji nagar
Ulhas River : उल्हास नदी मोकळा श्वास घेणार; प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने घेतला मोठा निर्णय

शिक्षकाला गाव गुंडाकडून मारहाण

बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर धक्कादायक प्रकार घडलाय. तुमची मुलगी मला द्या, म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. बंदुकीचा धाक दाखवून गावगुंडाने मारहाण केली, असा आरोप या शिक्षकाच्या नातेवाईकांनी केलाय. यानंतर याच शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालत मोठे नुकसान देखील केलंय. बाजीराव डोईफोडे असे या शिक्षकाचे नाव आहे. आता या शिक्षकावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 chhatrapati sambhaji nagar
Saam TV Poll : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? लोकांना काय वाटतंय? पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com