पोलीस अधिकाऱ्याच्या पोराचा प्रताप, निवडणूकही लढवलेली; बिल्डरचं अपहरण, निर्वस्त्र करुन रॉडने मारहाण; संभाजीनगर हादरलं

Chhatrapati Sambhajinagar Builder Kidnapped : संदीप शिरसाठ आणि त्यांच्या साथीदारांनी शरद राठोड नावाच्या बिल्डरचं अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली.
chhatrapati sambhajinagar crime builder sharad rathod kidnapped
chhatrapati sambhajinagar crime builder sharad rathod kidnappedSaam Tv News
Published On

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बिल्डरचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करून बिल्डरच्या सहकाऱ्याला डांबून जबर मारहाण केल्यावरून १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. प्रमुख आरोपीमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक लढविलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा उमेदवार राहिलेला संदीप शिरसाठ याचा समावेश आहे. रविवारी ६ एप्रिल रोजी पहाटे संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात सुधाकरनगर भागात घडलेल्या या प्रकाराबाबत फिर्यादीने थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. धक्कादायक बाब म्हणजे, संदीप शिरसाठ हा एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्याचा भाऊ पोलीस कर्मचारी मिथुन शिरसाट, स्वप्निल गायकवाड, हर्षल, निखिलेश कांबळे अशी आरोपींची नावे आहेत.

संदीप शिरसाठ आणि त्यांच्या साथीदारांनी शरद राठोड नावाच्या बिल्डरचं अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. यावेळी बिल्डर राठोड यांना अर्धा ते पाऊण तास रॉड, केबल, पट्टा, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या गंभीर गुन्ह्याची पोलीस आयुक्तांनी दखल घेतल्यानंतर पुढील कारवाई झाली. १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीप शिरसाठ यास अटक करण्यात आली आहे.

chhatrapati sambhajinagar crime builder sharad rathod kidnapped
KDMC Hospital Women Death : गर्भपाताच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल, त्याआधीच महिलेचा मृत्यू, नवऱ्याचा गंभीर आरोप; कल्याणमध्ये खळबळ

नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद भवसिंग राठोड (वय ३३, रा. कुमावतनगर, देवळाई चौक) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची अभिजित ऊर्फ बंटी बर्डे (वय २८) याच्याशी मैत्री आहे. बंटी पूर्वी आरोपी शिरसाठकडे शासकीय बांधकामाच्या टेंडरमध्ये सहायक म्हणून काम करत होता. मात्र संदीपकडून सतत होणाऱ्या त्रासामुळे त्याने राठोड यांच्या कार्यालयात काम सुरू केले होते. यानंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवलेला संदीप शिरसाट आणि त्याच्यासोबतच्या १० ते १५ जणांनी बिल्डर आणि त्यांच्या साथीदाराचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवलं. तसेच त्यांनी नग्न करून पट्ट्याने दोघांना मारहाण केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बंदुकीचा भाग दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

संदीपने राठोड यांच्या डोक्याला पिस्तूल लावून ‘तुला मारून डोंगरात फेकून देतो’ अशी धमकी दिली. यानंतर बर्डेला कॉल करून 'माझ्या दुचाकीचे पेट्रोल संपले आहे. तू लवकर ये', असं सांगण्याचे संदीपने राठोड यांना सांगितले. अभिजित पेट्रोल घेऊन आल्यानंतर संदीपच्या कार्यकर्त्यांनी अभिजितला पकडून आलिशान गाडीमध्ये आणले. त्यानंतर त्यालासुद्धा मारहाण करत त्याचा लॅपटॉप घेतला. अभिजितचे शर्ट आणि पँट जबरदस्तीने काढून घेतले गेले. तिथे दोघांनाही बेदम मारहाण केली. रविवारी पहाटे सातारा परिसरात सुधाकरनगर भागात घडलेल्या या प्रकाराबाबत फिर्यादीने थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार करून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुन्हा सातारा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. यात १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीप शिरसाट यास अटक करण्यात आली आहे.

chhatrapati sambhajinagar crime builder sharad rathod kidnapped
Wardha : विचित्र अपघात! डुक्कर आडवं आलं, कार टँकरला धडकली, एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com