Pune News : डॉ. घैसास यांना दणका, सुरक्षा व्यवस्था काढली

Dr. Sushrut Ghaisas news : तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यूनंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता पुणे पोलिसांनी त्यांची सुरक्षा काढून घेतली आहे.

पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल असलेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांनी झटका दिला आहे. घैसास यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

डॉ. घैसास यांच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी कार्यवाही करत त्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस मुख्यालयातील एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती.

तत्पूर्वी, या प्रकरणात पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे. तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यू प्रकरणात घैसास यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पडणार असून, ससून रुग्णालयाकडून रिपोर्ट आल्यानंतरच कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. घैसास यांची चौकशी पूर्ण झालीय. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com