Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार, कोणत्या भागाचा समावेश?

Pune Water supply news : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Pune Water Cut
Pune Water CutSaam Tv
Published On

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा दिवसभर बंद असणार आहे. पुण्यातील जुनी धायरी परिसरात पाणीपुरवठआ बंद असणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना येत्या बुधवारी पाणी जपून वापरावे लागणार आहे.

Pune Water Cut
Pune News: धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू, अंजली दमानियांच्या डोक्यात वेगळाच संशय

पुण्यात गुरुवारी जुनी धायरी परिसराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद असणार आहे. पुण्यात गुरूवारी जुनी धायरी येथे मुख्य दाब जलवाहिनीमधून पाण्याची होणारी गळती थांबवणे आणि पारी कंपनी रोड येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्याकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता व्यक्त केली जा आहे.

Pune Water Cut
Pune News: पुण्यात बसला भीषण आग, भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या|VIDEO

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

पारे कंपनी रोड, गणेश नगर,लिमये नगर गारमळा, गोसावी वस्ती,बारगणी मळा,दळवी वाडी,काबळे वस्ती, मानस परिसर,नाईक आळी,यशवंत विहार बुस्टर संपूर्ण परिसर लेन नंबर 1 ते 34 दोन्ही बाजू, रायकर नगर,चव्हाण बाग,त्रिमूर्ती हॉस्पिटल या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Pune Water Cut
UPSCमध्ये महाराष्ट्रातील 90 उमेदवार पास; कोण कोण अधिकारी होणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर

जळगावात लाखो लीटर पाणी वाया

जळगावच्या चाळीसगाव शहराची पिण्याची पाइपलाइन फुटली आहे. खोदकाम करत असताना शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम केले जात असताना पाइपलाइन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी अर्धे चाळीसगाव शहर जलवाहिनीवर अवलंबून असल्याने शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याची परिस्थिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com