Pune News: धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू, अंजली दमानियांच्या डोक्यात वेगळाच संशय

Mysterious Death of Manali Ghanwat Sparks Controversy: माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय उद्योजक राज घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune News
Pune NewsSaam
Published On

माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे उद्योजक राज घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. पुण्यातील जुपिटर रूग्णालयात त्यांना पहाटेच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी यावर प्रतिक्रिया देताना मनाली घनवट यांचा आकस्मिक नसून आत्महत्या असण्याची शक्यता असल्याचा दावा केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

'अत्यंत धक्कादायक माहिती. राज घनवट हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू झाला. पुण्यातील रूग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. ही आत्महत्या असल्याचं जवळच्या लोकांचे म्हणणे आहे. पण त्यांच्या पत्नीचा मृत्यू नैसर्गिक आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे', असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी घनवट यांच्यावर केला आहे.

Pune News
Crime News: डोक्यावर काचेचा ग्लास फोडला, कपडेही फाडले; दारूच्या अड्ड्यावर राडा, क्षुल्लक कारणावरून तरूणाला चोपला

शेतजमिनी लाटल्याचा आरोप

इतकंच नाही तर, दमानिया यांनी राज घनवटांवर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.'धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांमध्ये राज घनवट डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. याच घनवटनं आतापर्यंत शेतकऱ्यांच्या अनेक जमिनी लाटल्या. याच जमिनींच्या चौकशीची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती', असं अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Pune News
Marathi Actress: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने धर्म बदलला, फोटो पोस्ट करत दिली माहिती; नेटकरी म्हणाले..अगं

या सर्व प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, मनाली घनवट यांच्या मृत्यूमागचं सत्य काय? याबाबत चौकशी होण्याच्या प्रक्रिया उमटत आहेत. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com