Fandry
FandrySaam

Marathi Actress: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने धर्म बदलला, फोटो पोस्ट करत दिली माहिती; नेटकरी म्हणाले..अगं

Marathi Actress Rajeshwari Kharats Spiritual Journey Baptism: 'फँन्ड्री' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हिनं आपल्या आयुष्यातील एक मोठा निर्णय घेतला आहे. तिनं ख्रिश्चन धर्म स्वीकारून बाप्तिस्मा घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

'फँन्ड्री' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हिनं आपल्या आयुष्यातील एक मोठा निर्णय घेतला आहे. तिनं ख्रिश्चन धर्म स्वीकारून बाप्तिस्मा घेतल्याची माहिती इन्टाग्रामवर फोटो शेअर करून दिली आहे. या फोटोमध्ये राजेश्वरी नदीच्या पाण्यात हात जोडून उभी असून, तिच्या डोक्यावर आशिर्वाद देतानाचा हात आहे. तिने फोटोला 'Baptised' असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

जब्याची शालू अर्थात फँन्ड्री चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात घराघरात पोहोचली. या चित्रपटात तिने महत्वाची भूमिका बजावली होती. हा चित्रपट जातीभेदावर आधारीत असून, यात निखळ प्रेमाची देखील कहाणी आहे. या चित्रपटातून राजेश्वरीला खरी ओळख मिळाली.

Fandry
Mumbai Crime: छत्री अंगाला लागली, गर्दुल्ल्यानं धारदार काचेच्या तुकड्यानं महिलेची पाट सोलून काढली; भरदिवसा महिलेवर अटॅक

या चित्रपटानंतर राजेश्वरी अनेक अल्बम आणि शॉर्ट फिल्ममधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. फँन्ड्री चित्रपटानंतर तिने काही मराठी चित्रपटातही भूमिका साकारल्या. मात्र, तिला फारसे यश मिळाले नाही. सध्या तिचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर राजेश्वरी फार सक्रिय असते. दरम्यानच्या काळात तिला अनेक जाहिरातींचे प्रोजेक्ट देखील मिळाले होते.

Fandry
Raj-Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या युतीवर राज ठाकरे ॲक्शन मोडवर; मनसैनिकांना थेट आदेश | VIDEO

मात्र, आता तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोद्वारे तिने बाप्तिस्मा धर्म स्वीकारले असल्याची माहिती दिली आहे. या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकऱ्यांनी सकारात्मक तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com