मशिदींच्या भोंग्याआधीच, युद्धाचा सायरन वाजला, ब्रह्मोसच्या हल्ल्यानं पाक घाबरला; शाहबाज आतातरी 'शरीफ' व्हा

Pakistan Prime Minister Shahbaz Sharif : शाहबाज शरीफ सध्या चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. जगासमोर भारतानं हल्ला केल्याचं सांगत पाक स्वत:ला बिच्चारा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.
Pakistan Prime Minister Shahbaz Sharif
Pakistan Prime Minister Shahbaz SharifSaam Tv News
Published On

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकवर हल्ला केला. त्यावेळी पाकिस्तानमध्ये नेमकं काय सुरु होतं? आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार खोट बोलून पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ कसे तोंडवर पडलेत? पाहूयात या विशेष रिपोर्टमधून.

शाहबाज शरीफ सध्या चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. जगासमोर भारतानं हल्ला केल्याचं सांगत पाक स्वत:ला बिच्चारा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.. मात्र पाकचा हा खोटारडेपणा आता पाक पंतप्रधानांनीच उघड केलाय. ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकनं भारतावर हल्ला करण्याची कशी तयारी सुरु होती, याचं स्पष्टीकरणच शरीफांनी दिलंय.

Pakistan Prime Minister Shahbaz Sharif
Gokul Chairman : 'गोकूळ'वर महायुतीची सत्ता, नाविद मुश्रीफ नवे अध्यक्ष; गोकूळच्या चाव्या मुश्रीफांच्या घरात

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाची भूमिका महत्त्वाची होती. हवाई दलाच्या हल्ल्यात पाकमधील ९ एअरबेस उद्धवस्त झाले आणि त्यांची रडार सिस्टम बेचिराख झाली. ज्यामुळेच युद्धाच्या वल्गना करणाऱ्या पाकनं भारतासमोर गुडघे टेकले. पाकनं त्यानंतर अमेरिकेची मदत मागून भारतापुढे शस्त्रसंधीची विनंती केली. पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, या न्यायाने पाकनं शस्त्रसंधीचही उल्लंघन केलं. त्यामुळे पाकला आता जन्मभराची अद्दल घडवण्याचा निर्धार भारतानं केलाय.

Pakistan Prime Minister Shahbaz Sharif
Worli Property Deal : घरविक्रीचा सर्वात महागडा व्यवहार; 700 कोटीचं घर कुणी घेतलं? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com