
मायानगरी मुंबईत अनेक सेलिब्रेटी, उद्योजक आपल्या स्वप्नातील घराच्या शोधात असतात. पण प्रत्येकाला ते मिळतच असं नाही. काहींना मिळतं पण त्याची किंमत आवाक्याबाहेर असते. त्यातही अगदी सी फेस घर असेल तर विचारही करू नका....मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रात नुकताच महागडा व्यवहार झालाय. केवळ मुंबईच नाही तर देशातील सर्वात महागडा व्यवहार वरळीत झालाय.
फार्मा कंपनी यूएसव्ही लिमिटेडच्या चेअरपर्सन लीना गांधी-तिवारी यांनी वरळीत एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केली आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ ही इमारत आहे. नामन झाना नावाचा 40 मजली रेसिडेन्शियल टॉवर आहे. त्यातील 32व्या आणि 35व्या मजल्यावरील दोन अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंटची विक्री झाली आहे. ज्याची किंमत: 639 कोटी रुपये आहे. फ्लॅटचा प्रकार डुप्लेक्स म्हणजेच दोन फ्लॅट एकत्र केलेले आहेत.
एकूण क्षेत्रफळ - 22 हजार 572 चौरस फूट आहे.
प्रति चौरस फूट किंमत 2.83 लाख रुपये आहे.
फ्लॅटच्या नोंदणीसाठी 63.9 कोटी रुपये खर्च आलाय.
रिअल इस्टेटमध्ये मंदी आहे कोण म्हणतेय. वरळीतल्या या कोट्यवधींच्या व्यवहारानं डोळं पांढरे होण्याची वेळ आली आहे.
लीना तिवारी यांनी देशातील सर्वात महागडी निवासी मालमत्ता खरेदी करून अनेक मोठ्या नावांना मागे टाकले आहे. देशाची आर्थिक राजधानीत मुंबईतल्या घरांचे भाव असेही अव्वाच्या सव्वा झालेत. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात इंच इंच जागेसाठी लाखो रुपये मोजावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.