Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबई मेट्रोची दयनीय अवस्था, वरळी स्थानकांत पाणीच पाणी; प्रवाशांचा संताप

Mumbai Metro 3 Submerged: अलीकडेच उद्घाटन झालेल्या मुंबई मेट्रो लाईन ३ अ‍ॅक्वा लाईनच्या वरळी येथील आचार्य अत्रे चौक स्थानकात पहिल्याच पावसात पाणी शिरल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Metro
Metro Saam
Published On

यंदा पावसाने १२ दिवस आधीच मुंबईत दमदार एन्ट्री केली. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची बँटींग सुरू आहे. मात्र, पहिल्याच पावसानं मुंबईकरांना झोडपून काढलं आहे. मुंबईतील रस्ते तुंबले, नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत. विशेष म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रूळावरही पाणी भरलंय. आता मेट्रोलाही पावसाचा फटका बसला असल्याचं समोर आलंय. काही महिन्यांपूर्वी भुयारी मेट्रो ३ अर्थात अॅक्वा लाईन मेट्रो सुरू करण्यात आली होती. या मेट्रोची पावसामुळे दुरावस्था झाली आहे.

राज्य सरकारने अत्यंत गाजावाजा करत मुंबई मेट्रो ३ सुरू केली होती. त्यावेळी सरकारने ही भुयारी मेट्रो सुरक्षित असून, पावसाचा फटका या मेट्रोला बसणार नाही, असा दावा केला होता. मात्र, पहिल्याच पावसात या मेट्रोची दयनीय अवस्था झाली आहे. आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे भुयारी मेट्रोच्या वरळी आणि आणि आचार्य अत्रे या स्थानकांमध्ये पाणी भरलंय.

Metro
BJP Leader : शरीरसंबंधाच्या व्हिडिओनंतर, भाजप नेत्याचा 'तो' VIDEO व्हायरल, कार्यालयातच महिलेच्या मिठीत पडून..

सतत पडणाऱ्या पावसामुळे मेट्रो ३ च्या वरळी आणि आचार्य अत्रे स्थानकांमध्ये शिरलं आहे. यामुळे सेवा ठप्प झाली आहे. पावसाचं पाणी थेट वरळी स्थानकात शिरलं असून, छतांमधूनही पाण्याच्या झरा वाहत असल्याचं चित्र समोर आलं आहे. पाणी शिरल्यामुळे लाखोंच्या उपकरणांचे देखील नुकसान झालं आहे. सध्या मेट्रो प्रशासनाने अॅक्वा लाईन बंद केली आहे. तांत्रिक कारणामुळे मेट्रो सेवेवर परिणार झाल्याचं प्रशासनानं सांगितलं.

Metro
Highway Video: नेत्याचा हायवेवरील शरीरसंबंधाचा १ मिनिटाचा VIDEO समोर; अभिनेत्याचं ट्वीट, 'ती' निर्वस्त्र महिला कोण?

भुयारी मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्याच पावसात मेट्रो ३ची दयनीय अवस्था झाली. वरळी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्यामुळे सर्वत्र चिखल आणि पाणी साचले. प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिंधीसोबतही अरेरावी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com