Vaishnavi Hagawane : बायकोला ४ कानाखाली मारणे म्हणजे छळ नव्हे; कोर्टात सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? वाचा A टू Z माहिती एका क्लिकवर

Vaishnavi Hagawane case update : वैष्णवी हगवणे प्रकरणात शशांक , लता आणि करिश्माला एक दिवसाची पोलीस कोठडी तर राजेंद्र आणि सुशील यांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हगवणे यांच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय
Vaishnavi Hagawane News
Vaishnavi Hagawane caseSaam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेतील हगवणे कुटुंबातील पाचही आरोपींची पोलीस कोठडी संपल्यावर आज बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केलं. त्यातील पती शशांक हगवणे,सासू लता हगवणे,करिष्मा हगवणे यांना एक दिवसाची तर सासरे राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सुनावणीदरम्यान बायकोला ४ कानाखाली मारणे म्हणजे छळ नाही, असा युक्तिवाद कोर्टात हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केला.

वैष्णवी हगवणे प्रकरणातील पाचही आरोपींची आज पोलीस कोठडी संपली. त्यानंतर हगवणे कुटुंबातील सर्वांना आज बुधवारी शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायाधीशांनी त्यांना पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांकडून काही त्रास झाला का, हे विचारले. त्यावेळी पाचही आरोपींनी नाही, असे उत्तर दिले.

Vaishnavi Hagawane News
Mumbai Rain Update : मुंबईत पुन्हा मुसळधार; भर दुपारीच काळोख, कुठे-कुठे पाऊस बरसला?

यावेळी झालेल्या युक्तिवादात सरकारी वकील यांनी आरोपींचे मोबाईल सापडलेले नाहीत. फरार आरोपी निलेश चव्हाण कुठे आहे, याची चौकशी पोलिसांना करायची आहे‌. मोबाईलमधे व्हिडीओ शुटींग असू शकते. हगवणे कुटुंबाने हुंड्यात मिळालेले ५१ तोळे सोने गहाण ठेवले आहे. त्याची माहिती घ्यायची आहे. आरोपींनी वैष्णवी हगवणेला मारहाण केली आहे. ती हत्यारे आणि रॉड हस्तगत करायचा आहे, अस यावेळी युक्तिवाद सरकारी वकील यांनी केलं.

Vaishnavi Hagawane News
Vaishnavi Hagawane : वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, ते आम्ही पकडले, हगवणे कुटुंबाचा गंभीर आरोप

तर दुसऱ्या बाजूला हगवणे याचे वकील नितीन अडगळे यांनी युक्तिवादात म्हटलं की, पोलीस कोठडीची गरज नाही. गहाण ठेवलेले सोने कुठल्या बँकेत आहे. हे हगवणेंनी आधीच सांगितले आहे. तसेच निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणे चुकीचे आहेत. निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळलं आहे. पण हेळसांड केली म्हणून त्याच्यावरच गुन्हा दाखल केला आहे'.

'निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही. तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या. पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे आहे‌. तसेच वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते‌. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे, अस म्हणत हगवणे यांच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला आहे.

Vaishnavi Hagawane News
Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महत्वाचा पुरावा आढळला, पण...; पोलिसांनी कोर्टात काय सांगितलं?

तसेच हगवणेंचे वकील पुढे म्हणाले की वैष्णवीची आत्महत्येची प्रवृत्ती होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट सापडले गेले होते. त्यातुन तीने आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केला आहे. एकदा उंदीर मारण्यचं औषध खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलं आहे. एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ ठरत नाही. आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्हाला चाळीस लाखांच्या फॉर्चुनरसाठी कशाला छळ करु, असा युक्तिवाद देखील यावेळी त्यांनी कोर्टात केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com