Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महत्वाचा पुरावा आढळला, पण...; पोलिसांनी कोर्टात काय सांगितलं?

Vaishnavi Hagawane News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महत्वाचा पुरावा आढळल्याचा दावा पोलिसांनी केला. या प्रकरणाची महत्वाची पिंपरी चिंचवड पोलिसांनी कोर्टात दिली.
Vaishnavi Hagawane Case Update
Vaishnavi Hagawane Death Case Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात झाली. या सुनावणीदरम्यान पोलिसांनी कोर्टात महत्वाची माहिती दिली. राजेंद्र आणि सुशील यांनी लता आणि करिश्मा यांचे मोबाईल गायब केले आहेत. त्या मोबाईलमध्ये शंशाक आणि वैष्णवीचे चॅट आहेत. त्यात वैष्णवीला मारहाण केल्याचे पुरावे आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबाच्या आरोपाने ट्विस्ट निर्माण झाला आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सुरु आहे. या प्रकरणाची महत्वाची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी काही पुरावे मिळाल्याचा दावा कोर्टात केला आहे. या पुराव्याने हगवणे कुटुंबाच्या अडचणीत आणखी भर पडणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कोर्टात माहिती दिली की, 'राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी लता आणि करिश्मा यांचे मोबाईल गायब केले आहेत. त्या मोबाईलमध्ये शशांक आणि वैष्णवी यांचे चॅट आहेत. तसेच वैष्णवीला मारहाण केल्याचे काही पुरावे आहेत. निलेश चव्हाण आणि करिश्मा हे मानसिक त्रास देत होते'.

Vaishnavi Hagawane Case Update
Padma Awards 2025 : शेतकरी ते कलाकार; महाराष्ट्रातील ६ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित; माजी मुख्यमंत्र्यांनाही पद्मभूषण

पोलिसांनी कोर्टात काय सांगितलं?

पोलिसांनी सांगितलं की, 'फरार आरोपीचा शोध घ्यायचा आहे. राजेंद्र आणि सुशीलची चौकशी करायची आहे. लता, करिष्मा आणि सुशील यांचा मोबाईल शोधायचा आहेय. निलेश आणि सुशील यांच्यामधील व्हॉट्सॲप चॅट जप्त करायचे आहेत. सर्व आरोपींनी खासगी बँकेत गहाण ठेवले आहेत. नेमके ते कर्ज कोणाच्या नावाने आहे'.

Vaishnavi Hagawane Case Update
Wife Killed Husband : लग्नाच्या ३ वर्षांनंतर संसारात ठिणगी पडली; बायकोने नवऱ्याला टरबुजातून विष देऊन संपवलं, वटसावित्रीआधीच जीवघेणा खेळ

'मारहाण केल्याचे पुरावे या मोबाईलमध्ये आहेत. आरोपींचे बँक खाते आणि त्यांचे लॉकर गोठवलं आहे. आरोपींचा शस्त्र परवाना रद्द करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयात अहवाल सादर करण्यात आला आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com