Padma Awards 2025 : शेतकरी ते कलाकार; महाराष्ट्रातील ६ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित; माजी मुख्यमंत्र्यांनाही पद्मभूषण

Padma Awards 2025 update : महाराष्ट्रातील ६ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. यात अभिनेते अशोक सराफ यांचाही समावेश आहे. तसेच दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनाही पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Padma Awards
Padma Awards Saam tv
Published On

नवी दिल्ली : देशात विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ने आज मंगळवारी सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे.

Padma Awards
Reelstar shubham malve : चंगळ्या बोले कुहू! रिलस्टार शुभम माळवे अडचणीत, वकिलाने धाडली कायदेशीर नोटीस, काय आहे प्रकरण?

राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते आज दुसऱ्या आणि अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अन्य केंद्रीय मंत्री आणि केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या पुरस्कार समारंभात राज्यातील सहा मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Padma Awards
Income Tax Return बाबत महत्त्वाची अपडेट; आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली, नवी तारीख काय? वाचा सविस्तर

राज्याचे माजी मुख्यमत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर) आणि अशोक सराफ,अच्युत पालव, अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी तसेच कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डॉ. मनोहर जोशी यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्कार प्रदान

माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी ‘पद्मभूषण’ (मरणोत्तर) पुरस्कारने आज गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र उन्मेश जोशी यांनी स्वीकारला. डॉ. जोशी यांनी पाच दशकाच्या राजकीय कारकिर्दीत मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक,महापौर,आमदार,मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या.

Padma Awards
Beed Police : बीड पोलीस दलात मोठी उलथापालथ; पोलीस अधीक्षकांचा एक आदेश अन् पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

सन 1995 मध्ये ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2002 ते 2004 या कालखंडात त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवले. रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी जन्मलेल्या जोशी यांनी शिक्षण, शिस्त, आणि कार्यक्षम नेतृत्वाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांना मरणोत्तर पद्मभूषण या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com