Income Tax Return बाबत महत्त्वाची अपडेट; आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली, नवी तारीख काय? वाचा सविस्तर

Income Tax Return Update : आयकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिलाय. आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.
Income Tax
Income Tax Filing saam tv
Published On

ITR Update: आयटीआरबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. या निर्णयामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला ही मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत होती, आता ती वाढवून १५ सप्टेंबर २०२५ करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षात आयटीआर भरणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची सुधारणा आहे. करदात्यांना आयटीआर भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. ३१ मेपर्यंत टीडीएस स्टेटमेंट सादर केल्यानंतर, त्यातील माहिती करदात्यांच्या बँक खात्यात जून महिन्याच्या सुरुवातीस दिसू लागेल. जर अंतिम मुदत वाढवली नसती, तर करदात्यांना आयटीआर भरण्यासाठी कमी वेळ मिळाला असता.

आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, अंतिम मुदतीनंतर आयटीआर भरल्यास लेट फी तसेच इतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वाढवलेल्या मुदतीमुळे करदात्यांना आयटीआर वेळेत भरण्यासाठी पुरेसा अवधी उपलब्ध झाला आहे.

Income Tax
Viral News : मनोहरलाल धाकडनंतर आणखी एका भाजप नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

अंतिम मुदत का वाढवण्यात आली?

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सांगितले की, 'आयटीआर फॉर्ममध्ये केलेल्या बदलांमुळे, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सिस्टिमची तयारी आणि नवीन सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ आवश्यक होता'. त्यामुळे मंडळाने अंतिम मुदतीत वाढ केली आहे.

Income Tax
Reelstar shubham malve : चंगळ्या बोले कुहू! रिलस्टार शुभम माळवे अडचणीत, वकिलाने धाडली कायदेशीर नोटीस, काय आहे प्रकरण?

CBDT ने निर्णय का घेतला?

करदात्यांना आयटीआर भरताना कोणतीही अडचण येऊ नये, तसेच कागदपत्रे सुलभपणे जमा करता यावीत यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. सुरुवातीला अंतिम तारीख ३१ जुलै होती, परंतु आता ती १५ सप्टेंबर २०२५ करण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना पुरेसा वेळ मिळाला आहे. तसेच आयटीआर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

Income Tax
Nilesh Ghare Firing Case : युवासेना जिल्हाध्यक्ष गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; स्वत:च रचला गोळीबाराचा बनाव, नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com