Nilesh Ghare Firing Case : युवासेना जिल्हाध्यक्ष गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; स्वत:च रचला गोळीबाराचा बनाव, नेमकं कारण काय?

Pune nilesh ghare firing : युवासेना जिल्हाध्यक्ष गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे .या प्रकरणात निलेश घारे यांनीची गोळीबाराचा बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे.
Pune News
Pune nilesh ghare firing Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : शिवसेनेच्या युवासेना जिल्हाध्यक्ष गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांनीच स्वत:च्या कारवर गोळीबाराचा डाव रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस संरक्षण मिळावे आणि शस्त्र परवाना मिळावा यासाठी स्वतःच्या गाडीवर गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

निलेश घारे पुणे जिल्ह्याचे शिवसेनेच्या युवासेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. निलेश घारे यांनी पोलिस संरक्षण मिळावे आणि शस्त्र परवाना मिळवण्यासाठी स्वत:च्या कारवर गोळीबार केला. वारजे माळवाडी भागात घारे यांच्या कारवर १९ मे रोजी गोळीबार झाला होता. या गोळीबार प्रकरणी वारजे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी भागात पुणे जिल्ह्याच्या शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर १९ मे रोजी रात्री १२ वाजता अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार केल्याची माहिती वारजे पोलिसांना मिळाली होती. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी घारे यांच्या वाहनावर रात्री 12 वाजता गोळीबार केला होता.

Pune News
Mumbai Crime : कारचा धक्का लागला, राग अनावर झाला; दुचाकीस्वाराकडून चालकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

घारे हे आपले काम संपवून घराकडे निघाले होते. त्यावेळी मित्रांसोबत माळवाडी येथील गणपती माथा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आले. कार्यालयात आल्यानंतर बाहेर पार्किंग केलेल्या काळ्या रंगाच्या कारवर दोन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झालं नव्हते.

दरम्यान, वारजे पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत होतं. घारे हे शिवसेनेच्या (युवा सेना) जिल्हाप्रमुख आहेत. वारजे पोलिसांनी काल वारजे भागातून तीन जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार घडवून आणल्याची कबुली दिली. घारे यांनी याआधी वारजे पोलिस ठाण्यात शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज रद्द करण्यात आला होता.

Pune News
Meghana Bordikar : रस्त्यात दुचाकीचा भीषण अपघात; भर पावसात मंत्री मेघना बोर्डीकरांनी दिला मदतीचा हात

शस्त्र परवाना मिळावा आणि जिल्हाध्यक्ष असल्याने पोलिस संरक्षण मिळावे यासाठी त्यांनीच हा गोळीबार घडवून आणला आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सचिन गोळे, शुभम खेमणार आणि अजय उर्फ बगली सकपाळ असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी संकेत मातले हा फरार असून वारजे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com