Meghana Bordikar : रस्त्यात दुचाकीचा भीषण अपघात; भर पावसात मंत्री मेघना बोर्डीकरांनी दिला मदतीचा हात

Meghana Bordikar Latest news : परभणीच्या शेवगाव-पाथर्डी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातातील जखमींना मंत्री मेघना बोर्डीकरांनी मदतीचा हात दिला.
Meghana Bordikar News
Meghana Bordikar Saam tv
Published On

मुंबई : परभणीच्या शेवगाव-पाथर्डी महामार्गावर रविवारी दुपारी भर पावसात दोन दुचाकीस्वारांमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. यावेळी मार्गावरून प्रवास करत असलेल्या राज्याच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या लक्षात हा प्रसंग आला. त्यानंतर मंत्री बोर्डीकर यांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावर उतरून स्वतः मदतीसाठी पुढाकार घेतला.

Meghana Bordikar News
Mumbai Crime : कारचा धक्का लागला, राग अनावर झाला; दुचाकीस्वाराकडून चालकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

या अपघातादरम्यान घटनेदरम्यान मुसळधार पाऊस कोसळत होता. मंत्री बोर्डीकर यांनी पावसाची तमा न बाळगता अपघातस्थळी थांबत जखमींची विचारपूस केली. मंत्री मेघना यांनी त्यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी थांबवत ती जखमींना रुग्णालयात पाठवलं. त्याचबरोबर जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचार होतील, यासाठी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला. बोर्डीकरांनी आवश्यक सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही पोलीस अधिकाऱ्यांना दिले.

अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातानंतर उपस्थित नागरिकांनीही मदतीसाठी पुढे येत पोलीस आणि आपत्कालीन सेवांना माहिती दिली. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मंत्री बोर्डीकर यांच्या मदतीचं कौतुक होत आहे.

Meghana Bordikar News
Shocking News : ६ तासांत ५८३ पुरुषांशी शारीरिक संबंध; तरुणी थेट रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

दरम्यान, या अपघातामुळे पाथर्डी-बीड महामार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित झालाय. स्थानिक नागरिकांनी या मार्गावर गतीरोधक, इशारा फलक आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केली आहे. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com