Viral News : मनोहरलाल धाकडनंतर आणखी एका भाजप नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

BJP leader viral Video : मनोहरलाल धाकडनंतर आणखी एका भाजप नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालाय. आणखी एका नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
BJP leader News
BJP leader viral Videosaam tv
Published On

मनोहरलाल धाकडच्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मध्य प्रदेशमधील मनोहरलाल धाकडनंतर आणखी एका भाजप नेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मध्य प्रदेशच्या नर्मदपुराम जिल्ह्यातील सिवनी मालवा येथील भाजप नेत्याचा एका आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालाय. भाजप नेते कमल रघुवंशी यांचा एका लग्नसोहळ्यातील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओ व्हिडिओनंतर भाजप नेते कमल रघुवंशी यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.

BJP leader News
Nilesh Ghare Firing Case : युवासेना जिल्हाध्यक्ष गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; स्वत:च रचला गोळीबाराचा बनाव, नेमकं कारण काय?

भाजप नेते कमल रघुवंशी यांचा एक व्हिडिओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी लग्नसोहळ्यात एका महिला डान्सरसोबत अश्लील डान्स केला होता. यावेळी लग्नसोहळ्यातील उपस्थित लोकांनी हा क्षण मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला होता. कमल रघुवंशी आधी काँग्रेसमध्ये होते. सध्या ते भाजपमध्ये आहेत. कमल रघुवंशी यांच्या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलेसोबत अश्लील डान्स केल्याने रघुवंशी यांच्यावर टीका होत आहे.

BJP leader News
Kalyan News : कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट? खाडीपात्रात भराव टाकून अतिक्रमण, आमदार भोईरांनी केली मोठी मागणी

लग्नसोहळ्यात भाजप नेते रघुवंशी यांच्या आजूबाजूला लहान मुले देखील दिसत आहेत. ते लहान मुले रघुवंशी यांचं आक्षेपार्ह कृत्य पाहताना दिसत आहेत. भाजप नेते कमल सुर्यवंशी यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. भाजप नेत्याच्या आक्षेपार्ह डान्सनंतर पक्षातून हकालपट्टी करणे लोकांना अपेक्षित असताना पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. भाजप नेत्यावर कोणतीही कारवाई न केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

BJP leader News
BJP Leader Accident : बीडमधील भाजप नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू; कारचा अक्षरश: चक्काचूर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील राजकीय नेता मनोहरलाल धाकड याचा हायवेवर शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धाकडवर टीकेचा भडीमार झाला. त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी लोकांनी केली. या घटनेनंतर धाकड फरार होता. मात्र, मध्य प्रदेश पोलसांनी रविवारी धाकडला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com