Madhya Pradesh News: आईच्या डोळ्यांसमोर मुलींनी बापाला बेदम मारलं,कौटुंबिक वादाचा भीषण शेवट

Viral Video: गेल्या काही वर्षात देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.त्यातच पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात एका कौटुंबिक वादाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.ज्यात नक्की काय घडले ते एकदा पाहा.
Madhya Pradesh News
Viral VideSaam Tv
Published On

Daughters Beat Father Video: मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून,दोन मुलींनी आपल्या वडिलांना अमानुषपणे काठ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. विशेष म्हणजे संपूर्ण घटना आईच्या उपस्थितीमध्ये घडली आहे. मारहाण करण्यात आलेल्या वडिलांचा काही दिवसानंतर उपाचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे.

मुलींनी काठ्यांनी बेदम मारहाण; मृत्यूनंतरचा व्हिडिओ समोर

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला, दोन मुली त्यांच्या वडिलांना काठ्यांनी मारहाण (Beating)करताना दिसत आहेत आणि त्या व्यक्तीला जागेवरुन हालता यावे नाही म्हणून मुलींच्या आईने त्यांच्या पायाला पकडून ठेवले आहे. जेव्हा तिथे उपस्थित असलेल्या तरुणींच्या धाकट्या भावाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी भावालाही शिवीगाळ केली आणि वडिलांना बेदम मारहाण सुरुच ठेवली.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशमधील मुरैना येथील घटना व्हायरल होताच अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे. सध्या या घटनेनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केलाय. मात्र सध्या संपूर्ण मारहाणीचे कारण कौटुंबिक वाद असल्याचे सांगितले जात असून आम्ही याची कोणतीही पुष्टी करत नाही. मात्र हा व्हिडिओ सध्या देशभरात व्हायरल होत असून प्रत्येकजण हैराण झालेले आहे.

हा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यातील काही नेटकऱ्यांनी मुलींच्या या कृत्याचा तीव्र संताप व्यक्त केलाय, तर काही नेटकऱ्यांनी यामागील कारण समजून घेण्याची गरज असल्याचे म्हणत आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

Madhya Pradesh News
Professor Fight : पोरा-टोरानंतर शिक्षकांचा प्रताप, उपप्राचार्य-प्राध्यापकामध्ये हाणामारी, 'चाय पे चर्चा' असताना बिनसलं; Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com