Kalyan News : कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट? खाडीपात्रात भराव टाकून अतिक्रमण, आमदार भोईरांनी केली मोठी मागणी

Kalyan Latest Update : कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. खाडीपात्रात भराव टाकून अतिक्रमण केल्याची बाब उघडकीस आली आहे.
kalyan Latest News
kalyan Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याणमध्ये अनधिकृत कामांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. कल्याणमधील गांधारी खाडीपात्रात अतिक्रमण करण्यात आल्याचा बाब उघडकीस आली आहे. या पात्रात भराव टाकून अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचं समोर आलं आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आमदार विश्वनाथ भोईर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

kalyan Latest News
Tej Pratap Yadav : गर्लफ्रेंडचा फोटो पोस्ट करणं पडलं महागात; लालूप्रसाद यादवांकडून मुलाचं 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन, नेमकं काय घडलं?

कल्याण गांधारी परिसरात आमदार विश्वनाथ भोईर यांनी गांधारी खाडी किनारी असलेल्या धोकादायक परिसराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान खाडी पात्रात भराव टाकून खाडीचे पात्र अरुंद करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अनधिकृत भराव टाकून बांधकाम करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी आमदार भोईर तक्रार करणार असल्याचे सांगितले.

kalyan Latest News
Nilesh Ghare Firing Case : युवासेना जिल्हाध्यक्ष गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; स्वत:च रचला गोळीबाराचा बनाव, नेमकं कारण काय?

अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला राजकीय वरदहस्त असल्याने त्याची मजल वाढत असेल तर त्याला पाठीशी घातले जाणार नसल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले आहे. गांधारी पुलावरील अपघातप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. दोन दिवसांत गुन्हा न दाखल झाल्यास कारवाईची चेतावणी आमदार भोईर यांनी दिली.

kalyan Latest News
Shocking News : ६ तासांत ५८३ पुरुषांशी शारीरिक संबंध; तरुणी थेट रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पुलावर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाला एका दिवसातच जामीनावर सोडल्याने, पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा ठपका आमदार विश्वनाथ भोईर आणि आमदार शांताराम मोरे यांनी ठेवला आहे.

घटनास्थळी पाहणी करून त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. दोन दिवसांत कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गडचिरोलीला बदली करण्याची मागणीही आमदार भोईर यांनी केली आहे . कल्याणमध्ये पुन्हा अनधिकृत बांधकाम आढळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com