Tej Pratap Yadav : गर्लफ्रेंडचा फोटो पोस्ट करणं पडलं महागात; लालूप्रसाद यादवांकडून मुलाचं 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन, नेमकं काय घडलं?

Tej Pratap Yadav News : लालूप्रसाद यादवांकडून मुलाचं 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. गर्लफ्रेंडचा फोटो पोस्ट केल्याने लालूप्रसाद यादव यांनी कारवाई केली आहे.
Tej Pratap Yadav News
Tej Pratap Yadav :saam tv
Published On

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव यांनी मुलावर मोठी कारवाई केली आहे. लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रताप यांचं ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. तेजप्रताप यादव यांनी गर्लफ्रेंड अनुष्का यादवचे फोटो शेअर केले होते. काही तासानंतर तेजप्रताप यादव यांनी सोशल मीडियाचं अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला होता. मात्र, तेजप्रताप यादव यांच्या पोस्टमुळे बिहारचं राजकारण तापलं आहे.

लालूप्रसाद यादव यांनी मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. लालू यादव यांनी म्हटलं की, 'खासगी जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. माझ्या मोठ्या मुलाचे सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदार वर्तन आमच्या कौटुंबीक मू्ल्ये आणि परंपरेनुसार नाही. यामुळे आम्ही मुलाला पक्ष आणि कुटुंबापासून दूर करत आहोत. आता पक्ष आणि कुटुंबात त्याची कोणतीही भूमिका नसेल. त्याचं ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात येत आहे'.

Tej Pratap Yadav News
Maharashtra Monsoon: आनंदाची बातमी! केरळमध्ये धडकलेला मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचणार? वाचा सविस्तर

लालूप्रसाद यादव पुढे म्हणाले, 'तो त्याच्या खासगी जीवनातील चांगलं-वाईट आणि गुण-दोष पाहण्यास सक्षम आहे. तेजप्रताप यांच्यासोबत कोणीही मैत्रीपूर्ण संबंध ठेवत असेल, तर त्यांनी स्वत:च्या विवेक बुद्धीने निर्णय घ्यावेत. मी सार्वजनिक आयुष्यात नेहमी चारित्र्य सांभाळण्याचा बाबींना समर्थन दिलं आहे. कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात ही बाब स्वीकारली आहे. त्याचे पालन देखील केलं आहे'.

Tej Pratap Yadav News
Khed Firing : कोकण हादरलं! मुंबई-गोवा महामार्गावर गोळीबार; आधी पाठलाग केला अन्

लालूप्रसाद यादव यांच्या व्यतिरिक्त तेजप्रताप यांचा लहान भाऊ तेजस्वी यादव यांनी म्हटलं की, 'तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. पक्षाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या निर्णयाचे समर्थन करतो. ते प्रौढ्य आहेत. ते त्यांचा निर्णय घेण्यास सक्षम आहेत'.

Tej Pratap Yadav News
Rahuri to Shani Shingnapur : मोठी बातमी! राज्यात आणखी एका रेल्वे मार्गाला मान्यता, ४९४ कोटी रुपयांचा खर्चही मंजूर

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तेजप्रताप यादव यांनी शनिवारी एका तरुणीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, आम्ही १२ वर्षांपासून रिलेशनमध्ये आहे. तुम्हाला दीर्घकाळापासून ही बाब सांगायची होती'. यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. काही वेळेनंतर पुन्हा त्याच कॅप्शनने फोटो शेअर करून रिलेशनशिप असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा तेजप्रताप यांनी पोस्ट डिलीट केली. तेजप्रताप यांनी पुढे म्हटलं की, 'माझं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झालं आहे. एआय जनरेटेड फोटोच्या माध्यमातून बदनाम करण्यात आलं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com