
भारतभर उत्साहात धुळवड साजरी झाली. अनेक नेत्यांनी 'बुरा न मानो होली हैं' म्हणत मनसोक्त रंगांचा आनंद लुटला. सध्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रताप यादव यांचा एका व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यात ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे कपडे फाडून 'कुर्ता फाड' होळी साजरी करत आहेत. तसेच पोलीस शिपाईला ठुमके लावायला भाग पाडले आहे.
'तुला आज ठुमके लावावे लागतील नाहीतर तुला निलंबित व्हावे लागेल', असं तेज प्रताप व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
होळीनिमित्त आयोजित केलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमात बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव सामिल झाले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत कुर्ता फाड होळी साजरी केली. आपल्या निवास्थानी आलेल्या कार्यकर्त्यांचे जबरदस्तीने कपडे फाडून त्यांच्यावर रंग उधळले. एका व्हिडिओमध्ये तेज प्रताप यांच्या शेजारी पदाधिकारी बसलेला आहे. त्याचे देखील कपडे फाटलेले दिसत आहेत.
याशिवाय यादव यांनी पोलिसांनी भर कार्यक्रमात ठुमके लावायला सांगितले आहे. तेज प्रताप म्हणाले, 'ऐ शिपाईय.. ऐ दीपक, मी आता एक गाणे वाजवणार आहे. त्यावर तुला ठुमका लावायला लागेल. नाही नाचलास तर तुला निलंबित करू, बुरा न मानो होली है'. यानंतर तेज प्रताप गाणं लावतात आणि शिपाई पोलीस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर नाचतात. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी तेज प्रताप यादव यांच्यावर टीका केली आहे. 'जसा बाप तसा पुत्र. लालू यादव मुख्यमंत्री असताना त्यांनी व्यवस्थेला इशाऱ्यावर नाचविले आणि बिहारला जंगलराजमध्ये बदलले. त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा सत्तेच्या बाहेर असतानाही कायद्याच्या रक्षकांना खुलेआम धमक्या देत आहेत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.