Beed Police : बीड पोलीस दलात मोठी उलथापालथ; पोलीस अधीक्षकांचा एक आदेश अन् पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

Beed Police update : बीड पोलीस दलात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. पोलीस अधीक्षक कावमंत यांनी आदेश देऊन पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी केली आहे.
Beed Police update
Beed Police Saam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड पोलीस दलात काही दिवसांपू्र्वी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या आदेशानंतर ६०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी पुन्हा एकदा आदेश दिला. पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या आदेशाने आता पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची बदली झाली आहे. उस्मान शेख यांची थेट लातूरला बदली करण्यात आली आहे.

Beed Police update
Kalyan News : कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट? खाडीपात्रात भराव टाकून अतिक्रमण, आमदार भोईरांनी केली मोठी मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलीस निरीक्षक उस्मान शेख हे परळी पोलीस स्टेशनला होते. पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची बदली वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप झाला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनीही गंभीर आरोप केले होते.

Beed Police update
Wife Killed Husband : लग्नाच्या ३ वर्षांनंतर संसारात ठिणगी पडली; बायकोने नवऱ्याला टरबुजातून विष देऊन संपवलं, वटसावित्रीआधीच जीवघेणा खेळ

बीडवरून लातूरला बदली

बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची लातूरला बदली झाली आहे. त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार कोणाकडे दिले जातो, हे पाहावे लागणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडच्या पोलिसांवरती गंभीर आरोप झाले. त्यामध्ये बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते.

Beed Police update
Maratha Community : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजाची महत्वाची बैठक; चर्चेत कोणते ठराव मंजूर झाले? वाचा

उस्मान शेख यांची नियुक्ती वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप झाला होता. शेख यांच्या नियुक्तीचा आरोप भाजप आमदार सुरेश धस सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी केला होता. यानंतर बीडची पोलीस यंत्रणा आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

मात्र बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावंत बीडमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यासह आता ठाणे प्रमुखांच्याही बदल्या करण्याचं ठरवलं आहे. यामध्ये प्रमुख समजली जाणारी शाखा म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख उस्मान शेख यांची बदली आता करण्यात आली आहे. त्यांची बदली लातूरला करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com