Maratha Community : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजाची महत्वाची बैठक; चर्चेत कोणते ठराव मंजूर झाले? वाचा

Maratha Community meeting after vaishnavi hagawane case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजाची महत्वाची बैठक झालीये. या बैठकीत महत्वाचे ठराव मंजूर झाले आहेत.
vaishnavi hagawane case News
vaishnavi hagawane caseSaam tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजातील बांधवाची महत्वाची बैठक झाली. पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये मराठा बांधवांची बैठक ही बैठक झाली. मराठा समाजाच्या या बैठकीत समाज हिताचे निर्णय घेण्यात आले. वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे मराठा समाजाची लग्न सोहळ्यात होणारी प्रथा परंपरा यावर चर्चा झाली. या बैठकीत मराठा समाजाने महत्वाचे ठराव मंजूर झाले. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मराठा समाजाचे नेते बैठकीला उपस्थिती होते.

पुण्यात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजातील बांधवाची पुण्यात महत्वाची बैठक पार पडली. मराठा समाजाच्या बैठकीत प्रथा परंपरेवर चर्चा झाली. बैठकीतील उपस्थितांनी महत्वाच्या बाबी अधोरेखीत केल्या. लग्नाची आचारसंहिता, हुंडा, मुहूर्त याबाबत महत्वाची चर्चा झाली.

vaishnavi hagawane case News
Pune Baramati News : पुण्यात मुसळधार; बारामती तालुक्यात अतिवृष्टी, नीरा डावा कालवा फुटला, VIDEO

बैठकीत काय चर्चा झाली? जाणून घ्या सविस्तर मुद्दे

मराठा समाजात धाक नाही. मराठा समाजाने परीक्षण करण्याची गरज आहे. समाज बदनामी होतेय. जाणीवपूर्वक मराठा समाज टार्गेट होतोय का? विशिष्ट पक्षाला, जातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. मराठा समाज हा हगवणे यांनी केलेल्या कृत्य जे केले ते सपोर्ट करणार नाही. समर्थन करणार नाही. ही घटना झाली एका समाजातच होत नाही. सर्व समाजात ही वृत्ती असून समाजाला टार्गेट करायचे काम चालू आहे.

vaishnavi hagawane case News
Kalyan News : कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट? खाडीपात्रात भराव टाकून अतिक्रमण, आमदार भोईरांनी केली मोठी मागणी

मराठा समाज मस्तवाल आहेत असे चित्र उभे केले जाते. राजकीय मराठी लोकांनी पक्षाची कवाडे बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे. समाज संस्था म्हणून आपण काम केलं पाहिजे. मराठा समाजाची सध्या बदनामी सुरू आहे. आचारसंहिता करताना सुनांनी कसं वागायचं,नंदाने कस वागायचं हे शिकवा. मुलीमध्ये विश्वास व्यक्त करायला हवा. मुलीला शिकवा, तिला स्वतःच्या पायावर उभे करा.

दुसऱ्याने मोठे लग्न केले म्हणून आपणही केले पाहिजे, असा हट्ट नको. प्री-वेडिंग शूट म्हणजे अतिशय घाणेरडे प्रवृत्ती आहे. मुलीला शिकवा. तुम्ही तिला विश्वास द्या, आई-वडील भाऊ आम्ही सोबत आहोत. लग्न-टीळे याचं राजकीयकरण झालं आहे. पुणे शहरातील काही गावे, तिथं तुम्ही मांडव टाकायला, आठ-वीस लाख देतात. पुण्यात वीस लाखाच्या आत लग्नच होत नाही.

vaishnavi hagawane case News
Maharashtra Rain Update : मुसळधार पावसाचा दुसरा बळी; इमारतीचा स्लॅब कोसळून ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू, २ मुले झाली पोरकी

भाषणबाजी बंद करा. लग्न कमी वेळेत आणि कमी लोकात करा. कमी खर्चात करा. साखरपुडा-हळद एकत्रित केलं जावे. शाहू महाराज म्हटले होते की, जमीन विकून मुलीचे लग्न करू नका'. अल्पशिक्षित मुलाचा लग्नाचा मोठा प्रश्न आहे. आम्ही कसेही लग्न करायला तयार आहे. हुंडा द्यायला तयार आहे. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 25 टक्के मुलांचे लग्न होणार नाही हा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com