ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही अनेकदा टीव्हीवर पाहिले असेल की राजकीय नेत्यांचे बॅाडीगार्ड नेहमी काळ्या रंगाचा पोशाख आणि काळ्या रंगाचे गॉगल्स घालतात. पण ते अस का करतात याची काही कारणे आहेत.
काळे गॉगल्स बॅाडीगार्डसला गूढ आणि गंभीर दिसण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे त्यांची प्रतिमा अधिक प्रभावशाली आणि धाकदायक होते.
गॉगल्सचा रंग गडद असल्याने डोळ्यांचे हालचाल दिसत नाही यामुळे विरोधकांना त्यांचे लक्ष किंवा हालचाली ओळखणे कठीण जाते.
गॉगल्स चमक कमी करतात आणि उजेडात स्पष्ट दिसण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे सतर्कता टिकवता येते. यासाठी नेहमी ब्लॅक गॉगल्स घातले जातात.
काळे गॉगल्स लावल्याने चेहऱ्यावरील भावना आणि प्रतिक्रिया दिसत नसल्याने विरोधकांना त्यांचा विचार किंवा कृती ओळखणे कठीण होते.
जेव्हा एखादा स्फोट किंवा अचानक व्यत्यय येतो, तेव्हा मानवी स्वभाव हा आहे की तो हल्ला झाल्याचे जाणवताच प्रथम डोळे बंद करतो. ब्लॅक गॉगल्स घातल्याने अशा वेळीही डोळे उघडे आणि सतर्क राहण्यास मदत होते.
सूर्याची किरणे थेट डोळ्यात जाण्यापासून रोखण्यासाठी तसेच धूळ, वारा किंवा अचानक चमकलेल्या प्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे आणि यापासून बॅाडीगार्डची दृष्टी नेहमी स्पष्ट राहावी म्हणून ब्लॅक गॉगल्स घातले जातात.
काळ्या गॉगल्समुळे बॅाडीगार्डचे एकसंध, शिस्तबद्ध आणि व्यावसायिक स्वरूप दिसते.
NEXT: अंड खाल्ल्याने बर्ड फ्लू होतो का?