ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एव्हियन इन्फ्लुएंझा (H5N1) ए हा विषाणूचा उपप्रकार आहे. याला बर्ड फ्लू म्हणून ओळखला जातो.
अमेरिकेत एका ६५ वर्षीय व्यक्तीचा H5N1मुळे मृत्यु झाला आहे. त्याने अनेक जंगली पक्षी आपल्या घराच्या मागे ठेवले होते. यांच्या संपर्कात आल्याने त्याचा मृत्यु झाला.
पक्ष्यांमुळे विषाणू पसरतो अशा परिस्थितीत पक्ष्यांपासून विशेषतः कोंबड्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
अशातच अंड खाल्ल्याने बर्ड फ्लू होतो का हा प्रश्न अनेकदा पडतो. चला तर जाणून घेऊया.
तज्ञाच्या मते, किराणा दुकानात मिळाणारी अंडी नीट शिजवल्यास ती खाण्यासाठी सुरक्षित आहेत. कारण एव्हियन इन्फ्लुएंझा पोल्ट्री फार्ममध्ये अधिक संसर्गजन्य आहे.
यूएस फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशननुसार, संक्रमित कोंबड्याची अंडी किरकोळ बाजारात पोहचण्याची शक्यता फार कमी असते. तसेच अंड्याच्या टरफलमुळे मानवांना संसर्ग होण्याचा धोका कमी आहे.
कच्चं अंड आणि कच्चे दूध पिणे टाळा. एव्हियन इन्फ्लुएंझाची लागण झालेल्या गायीचे दूध पिणं टाळावे. तसेच दूध नेहमी उकळवून प्यावे.
जर तुम्हाला अंडीचा आहारात समावेश करायचा असेल तर उकडलेलं अंड खा. कारण आजपर्यंत योग्य प्रकारे शिजवलेल्या अंड्यांमधून बर्ड फ्लूचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी साऊथ स्टाइल पालक डोसा, वाचा रेसीपी