ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पालक, 1 1/2 कप तांदळाचे पीठ, 1/2 कप रवा, १ चमचा जीरा, ४ कप पाणी, आलं, २ मिरची, 1/2 चिली फ्लेक्स, हिंग, कढीपत्ता तेल आणि कांदा
सर्वप्रथम एक जुडी पालक गरम पाण्यात २ मिनिटांसाठी शिजवून घ्या. नंतर ते पाणी काढून पालक थंड करुन घ्या.
शिजवून घेतलेली पालक मिक्समध्ये वाटून प्युरी करुन घ्या.
एका मोठ्या भांड्यात दीड कप तांदळाचे पीठ, 1/2 वाटी रवा, १ चमचा जीरे, 3/4 मीठ, तयार केलेली पालक प्युरी आणि ४ कप पाणी अॅड करुन मिक्स करा.
तयार केले बॅटर चांगले फेटा आणि गुठळ्या नाही याची खात्री करा, नंतर यामध्ये आलं, २ मिरच्या, अर्धा चमचे चिली फ्लेक्स, कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग अॅड करा.
सर्व साहित्य अॅड करुन बॅटर चांगले फेटा आणि २० मिनिटांसाठी बॅटर झाकून ठेवा.
२० मिनिटानंतर हा बॅटर तयार आहे. आता डोसाच्या पॅन वर थोडे तेल अॅड करा आणि कांद्याने ते पसरवून घ्या. १ लहान वाटीने हे बॅटर पॅनवरल अॅडकरुन डोसा बनवा.
डोसाच्या वरती थोडे तेल शिंपडा आणि डोसा व्यवस्थित भाजा. हा हेल्दी आणि टेस्टी डोसा शेंगदाण्याच्या चटणीसह किंवा खोबऱ्याच्या चटणीसह पालक डोसाचा आनंद घ्या.
NEXT: HMPV व्हायरसनं आई-बाबांचं टेन्शन वाढवलंय, लहान मुलांची अशी घ्या काळजी