ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोरोना नंतर पुन्हा एकदा चीनमध्ये नव्या व्हायरसने थैमान घातला आहे. या व्हायरसचे नाव HMPV व्हायरस म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस आहे.
भारतात देखील या व्हायरसचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये एका ८ महिन्याचा मुलगा आणि एक ३ महिन्याची मुलगी तर अहमदाबाद येथे २ महिन्याच्या बाळाला या व्हायरसची लागण झाली.
HMPV व्हायरस विशेषतः १४ वर्षापेक्षा कमी वयातील मुलांना प्रभावित करत असल्याची माहिती मिळत आहे. ताप, खोकला, सर्दी, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही या व्हायरसची लक्षणं आहेत.
तसेच ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर आहे त्यांनी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दररोज पोषक तत्वांनी भरपूर संतुलित आहार घ्यावा.
ज्या लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर असते अशा मुलांमध्ये हा विषाणू लवकर पसरु शकतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, ड्राय फ्रुट्स, आंबट फळे, लसूण, हळद, आलं तसेच मध यांचा समावेश करा.
बदाम, सूर्यफूलाच्या बिया, चिया सीड्स आणि अक्रोड हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
साखरयुक्त पेय, मिठाई तसेच बाहेरचे प्रक्रिया केलेले अन्न खाणं शक्यतो टाळा.यांसारखे पदार्थ रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करु शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: नवी दिल्ली की मुंबई, कुठे आहेत सर्वात जास्त एअरपोर्ट ?