
बीडमध्ये सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातामध्ये ६ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी फाट्याजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील गढी परिसरात रात्री उशिरा हा अपघात झाला. सुरुवातीला पाण्यामुळे कारला अपघात झाला. ही कार डिव्हायडरवर चढली. अपघात झाल्यामुळे कारमधील सर्व जण खाली उतरले आणि रस्त्याच्या कडेला उभे राहिले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने सात जणांना चिरडले. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर तर दोन किरकोळ जखमी झाले.
या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण गेवराई तालुक्यातील होते. अपघातानंतर रस्त्यावर अक्षरश: रक्ताचे पाट वाहत होते. या अपघातामध्ये बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण एकाच ठिकाणचे होते. त्यांच्या निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे. या अपघाताचा तपास बीड पोलिसांकडून सुरू आहे.
या अपघाताची माहिती मिळताच बीड पोलिसांनी आणि आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला होता. पोलिसांनी या कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.