Beed News: वाल्मिक कराडच्या समर्थकांचा बीडमध्ये गुंडाराज, हॉटेल मालकाला लाकडी दांडके आणि बेल्टनं झोडलं; कारण फक्त..

Hotel Owner Beaten by walmik karad supporters: एका हॉटेल मालकाला आठ ते दहा जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
BEed
BEedSaam
Published On

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये गुंडाराज सुरू आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. अशातच बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका हॉटेल मालकाला आठ ते दहा जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. विशेष म्हणजे मारहाण करणारी टोळी वाल्मीक कराड समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे.

बीडच्या चऱ्हाटा रोडवर शिवमुद्रा हॉटेल आहे. या हॉटेल मालकाला क्षुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आठ ते दहा जणांच्या टोळक्याकडून हॉटेल मालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. लाकडी दांडके आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली असून, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

BEed
Crime News: बायको अन् बॉयफ्रेंडचा बेडवर रोमान्स, नवऱ्यानं रंगेहाथ पकडलं; संतापून पत्नीनं तलवारीनं पतीला संपवलं

दरम्यान, ही टोळी वाल्मीक कराड समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून अधिक संताप व्यक्त करण्यात येत आहे. टोळक्याकडून करण्यात आलेल्या मारहाणीत पालवन येथील अविनाश अनुरथ साबळे, नितीन अनुरथ साबळे आणि अमोल भगवान लोखंडे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

BEed
Highway Video: हायवेवरच शरीरसंबंध ठेवणाऱ्या नेत्यासह त्या महिलेचे आणखी २ व्हिडिओ व्हायरल; रस्त्यावरच नग्नावस्थेत नाचत होते...

मारहाण झाल्यानंतर जखमींना तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या गुन्ह्यात अक्षय साखरे, गजानन दहिफळे, सनी शिंदे सह इतर आरोपींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

BEed
BJP Leader : शरीरसंबंधाच्या व्हिडिओनंतर, भाजप नेत्याचा 'तो' VIDEO व्हायरल, कार्यालयातच महिलेच्या मिठीत पडून..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com